मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : यंदाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना यांना प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर आजच्या सामनात भाष्य करण्यात आलं आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर सामनातून टीका करण्यात आली आहे. रतन टाटांना उद्योगात चोऱ्या करून नफा नकोय, पण त्यांना पुरस्कार मात्र..पुरस्कार देणाऱ्यांचे काय ? त्यांचे हात चोऱ्या – लुटमारीत गुंतल्याने त्यांनी विश्वास नष्ट करून पक्षांतरे केली, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
हात चोऱ्या – लुटमारीत गुंतल्याने त्यांनी विश्वास नष्ट करून पक्षांतरे केली . अशा लोकांकडून श्री . रतन टाटांसारख्या विश्वासपात्र लोकांना पुरस्कार स्वीकारावा लागतो हे दुर्दैवच म्हणावे लागेल. रतन टाटा म्हणतातकी, ”व्यवसायाचा अर्थ नफा मिळवणे नव्हे, तर समाजाबद्दल असलेली आपली जबाबदारी समजून घेणे होय.” ही बांधीलकी टाटा आजही जपत आहेत. त्यांना उद्योगात चोऱ्या करून नफा नकोय, पण त्यांना पुरस्कार देणाऱ्यांचे काय ? त्यांचे हात चोऱ्या – लुटमारीत गुंतल्याने त्यांनी विश्वास नष्ट करून पक्षांतरे केली . अशा लोकांकडून श्री . रतन टाटांसारख्या विश्वासपात्र लोकांना पुरस्कार स्वीकारावा लागतो हे दुर्दैवच म्हणावे लागेल .
विश्वासराव पानिपतात मारले गेले किंवा हरवले यावर इतिहास आजही चिवडला जातोय. मात्र देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणातून विश्वास संपला आहे. राजकारण हे खोटेपणाच्या व अविश्वासाच्या पायावर उभे आहे. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच रोज खोटे बोलत आहेत. अशा खोटेपणाच्या वातावरणात महाराष्ट्र सरकारने उद्योगपती रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव केला. हा पुरस्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला व देवेंद्र फडणवीस, अजित पवार वगैरे लोक त्या सोहळय़ास उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ”टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे विश्वास.” प्रश्न असा आहे की, अशा विश्वासपात्र व्यक्तीला पुरस्कार देणाऱ्यांनी ‘विश्वास’ शब्दाची हत्याच केली.
अजित पवार, शिंदे, केसरकर, उद्योगमंत्री सामंत यांनी ‘विश्वास’ शब्दाची विल्हेवाट लावली व ते टाटांच्या निमित्ताने ‘ट्रस्ट’, ‘विश्वास’ अशा शब्दांची महती गात आहेत. टाटा म्हणजे ट्रस्ट. मग ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्यांची टाटांना पुरस्कार प्रदान करण्याची योग्यता खरोखरच आहे काय? टाटा यांचे राष्ट्र उभारणीत योगदान मोठे आहे. मिठापासून विमानांपर्यंतच्या उद्योगांत टाटा आहेत. टाटांनी महाराष्ट्रास कर्मभूमी मानले व उद्योगाचा विस्तार देशात केला. भारतीय उद्योगांचा पाया टाटांनी घातला तो विश्वासाच्या बळावर.
देश लुटून व राजकारण्यांची हाजी हाजी करून त्यांनी आपले उद्योगसाम्राज्य वाढवले नाही. ‘आधी राष्ट्र, मग नफा’ हा त्यांचा मंत्र. त्यामुळे इतर उद्योगांप्रमाणे चारसोबिसी करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. टाटा म्हणजे विश्वास. ग्राहकांची पहिली पसंती ही टाटांच्या उत्पादनांनाच असते. कारण टाटांच्या निष्ठा कधी बदलल्या नाहीत. मात्र देशाच्या राजकारणाची सध्या काय अवस्था आहे? आज राजकारण हा फसवाफसवीचा उद्योग बनला आहे. टाटांच्या उद्योगांवर कधी धाडी पडल्या नाहीत, पण टाटांना ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्या महानुभावांच्या उद्योगांवर धाडी पडत असल्याने विश्वासाची ऐशी की तैशी करून या सगळय़ांनी पक्षांतर केले व टाटांना पुरस्कार देण्यासाठी पुढे आले.