मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात एक मोठे वादळ आले. या वादळामध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने सत्तास्थापन केली. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. राज्यात अजून मंत्रीमंडळ विस्तार बाकी असून राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाचे सत्र काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीयं. यामध्येच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतलीयं. या मुलाखतीमध्ये अनेक मोठे खुलासे देखील करण्यात आले. मात्र, आता यावर शंभूराज देसाईंनी समाचार घेत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टिका केलीयं.
tv9 शी बोलताना शंभूराज देसाई यांनी फडणीसांची री ओढली ते म्हणाले की, काल फडणवीस साहेब म्हणाले तशी ही मॅच फिक्सिंग आहे. संजय राऊत सवाल करत उद्धव ठाकरेच त्याला उत्तर देतात. ते आम्हाला जे काही म्हणाले ते दुर्दैवी आहे. पण आमचे नेते शिंदे साहेब आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दाऊदशी संबंध असलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यासोबत मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरेंनी आम्हाला बसायला लावलं. शिंदे साहेबांनी कधीच स्वतःची तुलना बाळासाहेबांशी दिघेसांहेबांशी केलेली नाही. नैराश्यातून उद्धवसाहेब ही वक्तव्य करत आहेत.
शंभूराज देसाई यांनी बोलताना एक अत्यंत मोठा प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, मग पक्षप्रमुख कसे मुख्यमंत्री झाले? शंभुराज देसाईंनी थेट उद्धव ठाकरेंनाच हा सवाल केलायं. इतके नाही तर दाऊदशी संबंध असलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यासोबत मांडीला मांडी लावून आम्हाला बसवण्यात आल्याचा देखील आरोप देसाईंनी केल्याने राजकिय वर्तूळात एकच खळबळ उडालीयं. सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे नैराश्यात गेल्याचे देसाईंनी म्हटले आहे. आता शिवसेनेकडून शंभूराज देसाई यांनी केलेल्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. पालापाचोळा, गद्दार ते विश्वासघातकी असे अनेक आरोप बंडखोर आमदार तसेच एकनाथ शिंदे यांच्यावरती करण्यात आले आहेत.