Ajit Pawar : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या बंडामागे आहेत का? अजित पवार म्हणतात, मी अडीच वर्ष त्यांच्यासोबत काम करतोय!

| Updated on: Jun 23, 2022 | 7:19 PM

भांड्याला भांडं लागतं त्यातून आवाज येतो. त्यातून टोकाला कुणी जाऊ नये. तिथे जाणारे लोकं किती स्वखुशीने गेले? किती बळजबरीने गेले? हा संशोधनाचा भाग आहे. दोन आमदार आले.

Ajit Pawar : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या बंडामागे आहेत का? अजित पवार म्हणतात, मी अडीच वर्ष त्यांच्यासोबत काम करतोय!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या बंडामागे आहेत का? अजित पवार म्हणतात, मी अडीच वर्ष त्यांच्यासोबत काम करतोय!
Image Credit source: ani
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच (cm uddhav thackeray) असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकाचवेळी 47 आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले. तसेच सत्तेची अडीच वर्ष पूर्ण केल्यानंतर शिवसेनेचे (shivsena) आमदार फुटले. त्यामुळे या प्लॅनमागे उद्धव ठाकरे हेच असल्याचं सांगितलं जात आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियातही आहे. पण ही शक्यता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी फेटाळून लावली आहे. मी गेल्या अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करत आहे. त्यांचा स्वभाव मी पाहिला आहे. ते असं काही करतील असं वाटत नाही. तो त्यांचा स्वभाव नाही. एखादी गोष्ट करायची असेल तर ते स्वत:हून सागंतात, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे शिंदे यांच्या बंडामागे उद्धव ठाकरे यांचा हात असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देतानाच राष्ट्रवादी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे राहणार असल्याची ग्वाहीही दिली. मी अडीच वर्षापासून उद्धव ठाकरेंसोबत काम करत आहे. त्यांचा स्वभाव पाहिला आहे. ते अशा पद्धतीने स्वत:हून बंड घडवून आणतील असं वाटत नाही. त्यांचा स्वभाव तसा नाही. ते खुल्या मनाने सांगतात मला हे असं करायचं आहे. मी करणार आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचा पाठिंबा काढणार नाही

आम्ही शिवसेनेचा पाठिंबा काढणार नाही. आम्ही आघाडीला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्यासोबत कायम राहणार. नाना पटोले यांनी काय विधान करावं हा त्यांचा अधिकार आहे. मला त्याचं काय घेणं देणं? आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत. आम्ही आताच्या घडीला त्यांच्याबरोबर सत्तेत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

शिवसैनिक कायम सेनेसोबत राहिले

भांड्याला भांडं लागतं त्यातून आवाज येतो. त्यातून टोकाला कुणी जाऊ नये. तिथे जाणारे लोकं किती स्वखुशीने गेले? किती बळजबरीने गेले? हा संशोधनाचा भाग आहे. दोन आमदार आले. ते म्हणतात अजून काही लोक यायचे बाकी आहेत. काल वर्षावरून मातोश्रीवर मुख्यमंत्री जात असताना शिवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिला. शिवसेनेत ज्या ज्यावेळी बंड झालं. त्यावेळी नेते बाजूला गेले. त्यावेळी शिवसैनिक शिवसेनेसोबत राहिले हा इतिहास आहे, असं त्यांनी सांगितलं.