Amol Kolhe : अजितदादा म्हणालेत यावेळी पाडणार, मतदानाच्या दिवशी अमोल कोल्हे म्हणाले…

| Updated on: May 13, 2024 | 8:40 AM

Amol Kolhe : महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याच मतदान होत आहे. शिरुरमध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे. महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे तर महायुतीकडून अढळराव पाटील रिंगणात आहेत. 'अमोल कोल्हेला मी निवडून आणलं, यावेळी पाडणार' असं अजित पवारांनी जाहीर केलय.

Amol Kolhe : अजितदादा म्हणालेत यावेळी पाडणार, मतदानाच्या दिवशी अमोल कोल्हे म्हणाले...
Pune Ajit Pawar on Amol Kolhe Shirur Loksabha Election 2024 Latest Marathi News
Follow us on

“प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांच मनोबल वाढवण्याचा अधिकार आहे. महायुतीला त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांच मनोबल वाढवण्यासाठी ते अशा पद्धतीची विधान करतायत” असं अमोल कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हे शिरुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांचा सामना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या विरुद्ध आहे. कार्यकर्त्यांनाकडून पैसे वाटप झाल्याच्या तक्रारी येत आहेत, त्या प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले की, “अशा घटना कार्यकर्त्यांकडून समोर येत आहेत. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला सजग करण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीने मतदाराच मत विकत घेण्याची कोणाची मानसिकता असेल, तर मग नंतर मायबाप मतदाराच्या प्रश्नासाठी किती जागरुक राहणार, हा जनतेनेही विचार करण्याची गरज आहे. शिरुरची जनता मत विकत घेणाऱ्याला थारा देणार नाही”

अमोल कोल्हे यांनी एका बँकेसंदर्भात पत्र दिलं होत. बारामतीचा प्रकार उघड झाल्यानंतर त्यावर कारवाई झाली का? असं विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, “काही पतसंस्थांमधून संस्थेत विविध पदांवर असणाऱ्यांना भरमसाट कर्ज दिली गेली. त्यामुळे संशय निर्माण होतो. ज्या बँकेची शाखा बारामतील लोकसभा मतदारसंघात मध्यरात्री उघडी होती, पोलीस यंत्रणेला सजग राहण्यासाठी म्हणून पत्र दिलं होतं”

‘संध्याकाळी कन्फर्म लीड सागंतो’

शिरुर लोकसभा मतदारसंघात पाच आमदार आमच्याकडे आहेत, असा महायुतीचा दावा आहे, या प्रश्नावरही कोल्हे यांनी उत्तर दिलं. “पाच वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, तेव्हा पाच आमदार विरोधकांकडे तर एक आमदार राष्ट्रवादीकडे होता. आजही तीच स्थिती आहे, विधानसभेनंतर चित्र पालटेल” अजितदाद म्हणतात की, मागच्यावेळी मी निवडून आणलं, यावेळी पाडणार. त्यावर अमोल कोल्हे म्हणाले की, “आदरणीय साहेब माझ्या पाठिशी आहेत. शरदचंद्र पवार यांच्यावर प्रेम करणारी शिरुरची जनता आहे. उद्धव ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक पाठिशी आहे. महाविकास आघाडी दौदीप्यमान असा विजय मिळवेल” किती मताधिक्क्याने विजय होणार, यावर ‘आता लीड लांगणार नाही. संध्याकाळी कन्फर्म लीड सागंतो’ असं उत्तर दिलं.