नागपूर : नागपूरच्या (Nagpur) महानगरपालिकेच्या निवडणूकीची चर्चा संपूर्ण राज्यात असते. नागपूर महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडी देखील असल्याने यंदा नागपूरमधील निवडणूकीत नेमके काय होणार याची चर्चा आता जोर धरू लागलीयं. नागपूर महापालिकेत एकूण 156 जागा आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी 31, अनुसूचित जमातीसाठी 12 आणि महिलांसाठी 56 जागा राखीव (Reserved) ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणामुळे अनेकांना ऐनवेळी आपले प्रभाग देखील बदलावे लागले आहेत. महापालिकेत एकूण 52 प्रभाग आहेत. नागपूरची लोकसंख्या तब्बल 2447494 एवढी आहे. नागपूरमध्ये रस्त्यांची मोठी समस्या आहे. भाजपाला (BJP) सध्याचे राज्यातील राजकिय गणित बघता यंदा आपला बालेकिल्ला राखण्यासाठी मोठी लढत द्यावी लागणार हे नक्कीच आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
प्रभाग क्रमांक 12 ची निवडणूक दरवेळीच अटीतटीची ठरते. प्रभाग क्रमांक 12 ची एकूण लोकसंख्या 50416 इतकी आहे. नाईक तलाव, खरीपूरा, लेंडी तलाव, तांडापेठ, पाचपावली, ठक्करग्राम, विनकर कॉलनी, बारसेनगर नंदागीरी, संभाजी कसार. मुंबई हावडा रेल्वे मार्ग व इतवारी रेल्वे मार्गाचे संगमापासून पूर्वकडे जाणाऱ्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गाने, खैरीपुरा शीतलामाता मंदीर जवळील खैरीपूरा नाल्याच्या रेल्वे पुलापर्यंत. तर खैरीपूरा शितलामाता मंदीरजवळील मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील खैरीपूरा नाल्याच्या पुलापासुन दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्याने दिलीप बारापात्रे व कृष्णा पौनीकर यांच्या घरापर्यंत आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
मुकुंदा भिसीकर यांच्या घरापर्यंत, नंतर पुढे आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याने महंदीबाग रोडवरील चखणा चौकापर्यंत. नंतर पुढे नेऋत्य दिशेकडे जाणान्या मेहंदीबाग रस्त्याने राऊत चौकापर्यंत. नंतर पुढे त्याच रस्त्याने इतवारी रेल्वे मार्गावरील मस्कासाथ रेल्वे पुलापर्यंत. दक्षिण पश्चिम इतवारी रेल्वे मागावरील मस्कासाथ रेल्वे पुलापासून वायव्ये दिशेने जाणाऱ्या इतवारी रेल्वे मार्गाने मुंबई हावड़ा रेल्वे मार्ग व इतवारी रेल्वे मागांचे संगमापर्यंत प्रभाग क्रमांक 12 आहे. इतर प्रभागाच्या तुलनेत या प्रभागामध्ये लोकसंख्या कमीच आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
नागपूर महापालिका जरी भाजपाचा गड असली तरीही प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपासोबतच काँग्रेसचेही वर्चस्व बघायला मिळते. प्रभाग 12 मध्ये भाजपाचे दोन नगरसेवक तर काँग्रेसचे दोन नगरसेवक असल्याने दोन्ही पक्षांना यंदा आपले वर्चस्व ठेवण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये गट अ मधून माया इनवते भाजपा, प्रभाग क्रमांक 12 मध्ये गट ब मधून जगदीश ग्वालवंशी भाजपा, प्रभाग क्रमांक 12 मध्ये गट क मधून दर्शनी धवड काँग्रेस, प्रभाग क्रमांक 12 मध्ये गट ड मधून हरीश ग्वालवंशी काँग्रेस हे 2017 ला निवडून आले.