नागपूर: भाजपची (bjp) सत्ता असलेल्या नागपूर महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण यंदा नागपूर महापालिका (NMC Election 2022) 14 प्रभागांनी वाढली आहे. तसेच आधी महापालिकेत 151 नगरसेवक होते. आता हा आकडा 156 झाला आहे. त्यात 113 वॉर्ड जनरल असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 31 तर अनुसूचित जमातीसाठी 12 वॉर्ड राखीव असणार आहेत. तर महिलांसाठी 78 वॉर्ड राखीव असणार आहेत. या शिवाय राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. नागपूरकर असलेले देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. आधीच नागपूर पालिकेत भाजपची सत्ता होती. आता राज्यातही भाजची सत्ता आल्याने त्याचा परिणाम तर महापालिका निवडणुकांवर होणार आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिवाळीत महापालिका निवडणूक होणार असल्याने आतापासूनच इच्छूकांनी सेटिंगचे फटाके वाजवण्यास सुरुवात केली आहे.
जुन्या प्रभाग क्रमांक 17मध्ये चार वॉर्ड होते. या चारपैकी तीन वॉर्डात भाजपने विजय मिळवला होता. तर एका वॉर्डात काँग्रेसला विजय मिळाला होता. प्रभाग क्रमांक 17 अ मधून भाजपचे विजय चुटेले विजयी झाले होते. 17 ब मधून भाजपच्या लता काडगये, 17 क मधून काँग्रेसच्या हर्षला साबळे आणि 17 ड मधून भाजपचे प्रमोद चिखले निवडून आले होते. आता या प्रभागातील चार वॉर्डांचे तीनच वॉर्ड करण्यात आल्याने या मतदारसंघात कोण उभे राहणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रभाग 17 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
परिसीमनानंतर प्रभाग क्रमांक 17 चा चेहरामोहरा बदलला आहे. त्यानंतर या मतदारसंघात आरक्षणही पडलं आहे. प्रभाग क्रमांक 17 अ आणि 17 ब हे दोन वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत. तसेच 17 क हा वॉर्ड जनरल झाला आहे.
परिसीमनामुळे तयार झालेल्या नव्या प्रभाग क्रमांक 17मध्ये तीन नगरसेवकांचं भवितव्य अर्धा लाख लोक ठरवणार आहेत. प्रभाग क्रमांक 17 अ, 17 ब आणि 17 कमध्ये एकूण 46 हजार 254 मतदार होते. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 5 हजार 111 आहे. तर अनुसूचित जमातीची संख्या 2 हजार 460 आहे.
प्रभाग 17 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
नव्या प्रभागात भूपेशनगर, पोवलस लाईन टाकळी, वगट्टीखदान, शीलानगर, अनंत नगर, एकतानगर, महेशनगर, जाफरनगर, राठोड लेआऊट, योगेंद्रनगर, आदर्श कॉलनी, पेन्शन नगर, नेहरू कॉलनी, मंजीदाना कॉलनी, बोरगाव आदी विभाग येतात.
प्रभाग 17 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |