नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे (Nagpur Shiv Sena). भाजपला टक्कर देण्यासाठी पक्ष मजबूत करा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. पण भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात शिवसेनेला ग्रहण लागलं आहे. उपराजधानीत शिवसेना पक्ष सध्या विना पदाधिकाऱ्यांचा आहे (Nagpur Shiv Sena). त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. विना पदाधिकारी फडणवीसांच्या नागपुरात शिवसेना भाजपला टक्कर कशी देणार? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.
राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. पण उपराजधानीत शिवसेनेचा कारभार सध्या राम भरोसे सुरु आहे. नागपुरात शिवसेनेला सध्या शहराध्यक्ष आणि जिल्हाप्रमुख नाही. विना पदाधिकारी शिवसेना नागपुरात भाजपला टक्कर कशी देणार? हाच मोठा प्रश्न आहे.
हेही वाचा : आपआपसात मारामाऱ्या करा, पण लोकांचा फायदा करा : देवेंद्र फडणवीस
राज्यात शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात धरला. राज्यात पहिल्यांदा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. तेव्हापासून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. शिवसेनेचे नेते भाजपला टक्कर देण्याची भाषा करत आहेत. पण फडणवीसांचा गड असलेल्या नागपुरात शिवसेना विना पदाधिकारी भाजपला टक्कर कशी देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
नागपुरात शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून ग्रहण लागलं आहे. शिवसेना शहरप्रमुख मंगेश कडवविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले. त्यामुळेच पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. जिल्हा युवा सेना प्रमुखांवरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पक्षाने थेट जिल्हाप्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांनाच स्थगिती दिली. त्यामुळे उपराजधानीतील शिवसेनेला सध्या जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुख दोन्ही नाहीत.
शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांचं नागपुरकडे कायम दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळेच एवढ्या वर्षांत शिवसेनेला नागपूर शहरात फारसं यश आलं नाही. आता सत्तेचा फायदा होईल, इथली शिवसेना बळकट होईल, असा सामान्य शिवसैनिकांना आशावाद होता. पण पदाधिकारीच नाही, तर मग नागपूर शहरात शिवसेनेला बळकट कोण करणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.