आधी आमदार, मग चिन्ह अन् आता शिवसेनेचं पक्ष कार्यालयही शिंदेगटाच्या ताब्यात

| Updated on: Dec 19, 2022 | 1:45 PM

शिवसेनेचं पक्ष कार्यालय शिंदेगटाच्या ताब्यात गेलंय...

आधी आमदार, मग चिन्ह अन् आता शिवसेनेचं पक्ष कार्यालयही शिंदेगटाच्या ताब्यात
Follow us on

नागपूर : शिवसेना… या पक्षातील नेत्यांची एकजूट हीच या पक्षाची सर्वात मोठी ताकद असल्याचं बोललं जायचं. शिवसेनेची हीच ताकद जून महिन्यात दोन गटात विभागली गेली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंड पुकारलं. त्यानंतर ठाकरेगट आणि शिंदेगट अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली. त्यानंतर काही दिवसात शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेलं धनुष्यबाणही गोठवण्यात आलं.या सगळ्यामोडींनंतर आता शिवसेनेचं पक्ष कार्यालयही (Shivsena Party Office) शिंदेगटाच्या ताब्यात गेलंय.

शिवसेना कार्यालय शिंदेगटाकडे

सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. 2019 नंतर पहिल्यांदाच नागपुरात हिवाळी आधिवेशन होतंय. या अधिवेशनावेळी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात बदल करण्यात आलेत. शिवसेनेचं पक्ष कार्यालय आता शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आमदारांची संख्या पाहता नागपूर विधिमंडळातील हे कार्यालय शिंदेगटाला देण्यात आलं आहे.

कर्मचारी भावूक

शिवसेनेचं कार्यालय सोडण्याची वेळ आली तेव्हा वर्षानुवर्षे या कार्यालयात काम करत असलेले कर्मचारी भावून झाले.महिला कर्मचाऱ्यांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. या महिला कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

ठाकरे गटाला पर्यायी जागा

शिवसेनेचं पक्ष कार्यालय शिंदेगटाकडे गेलंय. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. 19 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर असं हे 10 दिवसीय अधिवेशन असेल. यंदाचं अधिवेशन वादळी असणार यात शंका नाही. कारण शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर नागपुरात होणारं हे पहिलं अधिवेशन आहे.याआधीच्या पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे कुठले मुद्दे उपस्थित करणार हे पाहणं महत्वाचं असेल.