गरीबांनी मरावं, श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा; नाना पटोलेंचा घणाघात

| Updated on: May 30, 2021 | 2:06 PM

मोदी सरकारला केंद्रात सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. (nana patole attacks bjp over modi government’s 7th anniversary)

गरीबांनी मरावं, श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा; नाना पटोलेंचा घणाघात
nana patole
Follow us on

मुंबई: मोदी सरकारला केंद्रात सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजप सरकारची दुटप्पी भूमिका आहे, असं सांगतानाच देशातील गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं हीच मोदी सरकारची इच्छा आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे. (nana patole attacks bjp over modi government’s 7th anniversary)

नाना पटोले यांनी टीव्ही 9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. कोरोनावर वेळीच उपचार झाले असते तर अनेकांचे जीव गेले नसते. पण मोदी सरकारने टाळ्या-थाळ्या वाजवून देशावासियांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटलं. मग आता सत्कार कराय करताय?, असा सवाल करतानाच सुटाबुटाचं सरकार म्हटल्यावर भाजपला त्रास झाला. पण पंचतारांकीत हॉटेलमध्ये लसीकरणाची भूमिका भाजपची आहे. गरीबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जगावं असं मोदी सरकारला वाटतंय, अशी टीका पटोले यांनी केली.

फाईव्ह स्टार घोटाळा भाजपच्या रक्तात

बड्या उद्योगपतींचे 68 हजार कोटी रुपये केंद्र सरकार भरत आहे. फाईव्ह स्टार घोटाळा तर भाजपच्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहे. रेमडेसिवीर बॅन असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं तरीही मोदी सरकारने आपल्या मित्रांसाठी ते वितरीत केलं. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा ताबा केंद्र सरकारने घेतला. टाक्या साफ नव्हत्या. त्यामुळे ब्लॅक फंगससारखे आजार निर्माण झाले, असा आरोप त्यांनी केला.

ओबीसी आणि मराठा आरक्षण केंद्राचाच विषय

ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हा केंद्राचा विषय आहे याच्या स्पष्ट गाईडलाईन्स आहेत. ओबीसींची संख्या किती आहे हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता याच मुद्द्यावरून आरोप करत आहेत. त्यांची आधीची भाषणं ऐका. खोटं बोला पण रेटून बोला हा त्यांचा अजेंडा आहे, अशी टीका त्यांनी केली. घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेला नाही. केंद्राने या विषयावर निर्णय घेतला तर काहीच अडचण राहणार नाही, हे सर्वोच्च न्यायालय सांगत आहे. मग ओबीसी आणि मराठा समाजाला त्रास का दिला जात आहे. भाजपला राज्यातील जनता कधीच माफ करणार नाही, असं ते म्हणाले.

भाजप ओबीसींचे हत्यारे

आरक्षणासाठी मागास आयोग नेमा असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगत आहेत. मराठा आरक्षणासाठीही मागास आयोग नेमला होता. काय झालं त्याचं? आता आम्ही पुन्हा नेमू पण काय होणार? गायकवाड आयोगाची अवस्था काय आहे हे पाहा, असं सांगतानाच भाजप हे ओबीसींचे हत्यारे आहेत. ओबीसींच्या मतांवर भाजप मोठी झाली आहे आणि आज त्यांचंच नुकसान करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. (nana patole attacks bjp over modi government’s 7th anniversary)

 

संबंधित बातम्या:

आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करताय?; भाई जगताप पोलिसांवर भडकले

जनगणना केल्यावरच ओबीसींना न्याय मिळेल; विजय वडेट्टीवारांनी केल्या ‘या’ तीन मागण्या

Maharashtra Coronavirus LIVE Update : केंद्राने लसीकरण पुरवठा केला म्हणजे उपकार केले नाहीत : भाई जगताप

(nana patole attacks bjp over modi government’s 7th anniversary)