मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचं आणि जामीनाचं मोठं राज्यकीय नाट्य मंगळवारी घडलं. त्यानंतर आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात आज नारायण राणे आणि भाजपविरोधात जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावरुन राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना ‘संजय राऊत हे संपादक पदाच्या लायकीचे नाहीत. ते फक्त उद्धव ठाकरे खूश व्हावे इतकंच लिहितात. मी त्यांना 17 तारखेनंतर उत्तर देईन’, असा इशारा राणे यांनी दिला आहे. (Narayan Rane criticizes MP Sanjay Raut, Raut gives important advice to Rane)
राणेंनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी राणेंना सल्ला दिलाय. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. अशा व्यक्तीला बोलण्याची पद्धत माहिती असायला हवी. तुम्ही महाराष्ट्रात येता, मुख्यमंत्र्यांना मारण्याची भाषा करता. तुम्ही मुख्यमंत्र्यांना मानत नसाल पण ते मुख्यमंत्री आहेत. पोलिसांनी कायद्यानं आपलं काम केलं आहे. नारायण राणे मंत्री आहेत की अजून काही, कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. नारायण राणे कॉमन माणूस आहे, तुम्ही त्यांना मोठं केलंय. आम्हालाही जनतेचा आशीर्वाद आहे म्हणूनच आम्ही सत्तेत आहोत. लोकशाहीत जनतेचा आशीर्वाद अनेकांना मिळाला आहे. आज मोदींना मिळालाय, मागे इंदिरा गांधींना, राजीव गांधींना मिळाला होता, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तसंच सुधर जाओ, संभल जाओ, अशा शब्दात राऊतांनी राणेंना सल्लाही देऊ केलाय.
अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला. अरे काय सुरु आहे. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झालं. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. लोकशाही मार्गानं लढा देणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही, अशा सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या प्रकरणातही चौकशी सुरु आहे, त्याचाही आता पाठपुरावा सुरु राहील, असंही राणेंनी म्हटलंय. काही गोष्टी करायला हे प्रवृत्त करत आहेत. फार सभ्य आहेत ना, काहीच करत नाहीत ना, आता जनतेला त्यांची करामत कळू द्या, अशा कडक शब्दात राणेंनी शिवसेनेवर हल्ला चढवलाय.
“या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरु केला. त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. भूतकाळात एखादी घटना घडली आणि कसा क्राईम होतो? काय पत्रकारिता आहे? आम्ही पाहिलीच नाही. आक्षेप नाही. शिवसेनेच्या नेत्याने असे शब्द उच्चारले नाहीत?” असा सवाल नारायण राणे यांनी केला.
इतर बातम्या :
‘भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू’, विनायक राऊतांचा जोरदार टोला
Narayan Rane criticizes MP Sanjay Raut, Raut gives important advice to Rane