रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली. त्यानंतर आता राणे यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी जमीन मंजूर केला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली खेचली असती अशी भाषा केल्याने नारायण राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथकं चिपळूणकडे रवाना झाली. त्यातच युवासेना आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत मुंबईतील नारायण राणे यांच्या घराकडे कूच केली. वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासेनेचे कार्यकर्ते राणेंच्या बंगल्यावर निर्देशने केली.
राणे यांच्याविरोधात शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राणे यांना महाड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हजर करण्यात आलं होतं. राणे यांना दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला आहे.
VIDEO :
Narayan Rane LIVE Updates
मुंबई : नारायण राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भाजप नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे
या बैठकीत राणे यांच्यावर केलेल्या कारवाईबद्दल चर्चा केली जाणार आहे
तसेच पुढील रणनीती कशी असावी याबद्दल चर्चा केली जाणार आहे
मुंबई : राज्यात काही लोक भाडोत्री पद्धतीने कमेंट्स करतात. राजकारणामध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या शब्दामध्ये आक्षेप घेता तेव्हा त्यांचं चरित्र्य तपासलं पाहिजे. नारायण राणे यांनी जे वाक्य वापरले त्याचं समर्थन होऊ शकत नाही. आपण जेव्हा असे वाक्य वापरतो त्यांनी जेलमध्ये जाण्याची तयरी ठेवली पाहीजे. आत्ताही प्रायश्चित्त घेत ज्यांनी ज्यांनी असे शब्द वापरले त्यांना सर्वांना अटक करा, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसेच याचा हिशोब जनता घेतल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
नारायण राणे यांना जामीन मंजूर
नारायण राणे यांना दिलासा
युक्तीवाद संपला, काही क्षणात दंडाधिकारी जामिनावर निर्णय देणार
नारायण राणेंना जामीन मिळणार का ?
महाड : न्यायालयात जामीन मंजूर झाला तरी नाशिक पोलिसांकडून राणेंना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता
त्यामुळे राणेंना तुर्तात दिलासा मिळण्यावर प्रश्न
नाशिक आणि पुणे पोलीस महाडमध्ये उपस्थित
नितेश राणे कोर्टात उपस्थित निलमताई राणे यांचे कोर्टात आगमन
राणेचे वक्तव्य बेजबाबदारणाचं – सरकारी वकील
राणेना अटकेसाठी कुठलीही ऑर्डर देण्यात आली नाही – राणे वकील
नारायण राणे यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं आहे
पोलिसांनी राणे यांना 7 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे
तर राणेंच्या वकिलांकडून जामीन देण्याची मागणी
नारायण राणेंना न्यायालयात आणलं
थोड्याच वेळात सुनावणी
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर होणार सुनावणी
महाड : थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केलं जाणार
महाड न्यायालयाबाहेर हालचाली वाढल्या
रायगड : प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बाबासाहेब शेख पाटील यांच्या कोर्टासमोर चालणार नारायण राणेंचा खटला
राणेंच्या अटक कारवाईचा खटला महाड येथील कोर्टात चालणार
अॅड अनिकेत उज्वल निकम, अॅड भाऊ साळुखे नारायण राणे यांची बाजू मांडणार
रायगड : महाड MIDC पोलीस ठाण्याला येणाऱ्या राणे समर्थकांच्या गाडीवर दगडफेक
नारायण राणे समर्थकांचा पोलीस स्टेशनबाहेर गोंधळ
शिवसेनिकांना समोर येऊन हल्ला करण्याचे आव्हान
महिलांना पुढे करुन दगड मारल्याचा राणे समर्थकांचा आरोप
नारायण राणे महाड पोलीस ठाण्यात दाखल
राणेंना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार
सध्या महाड पोलिसांच्या ताब्यात नारायण राणे
नारायण राणे यांना प्रथम वर्ग न्यायदडांधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार
महाडमधील कोर्टात VC द्वारे हजर करणार असल्याची सुत्रांची माहीती
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणेवंर केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर आता सिंधुदुर्गातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्टेशनला धडक देत राणेंच्या अटकेचा निषेध करत निवेदन दिलं आहे. भाजप कार्यकर्त्यांनी संयम राखला असून शिवसेनेकडून जर अनुचित प्रकार घडल्यास भाजप कार्यकर्त्यांचा संयम सुटेल, असा इशारा यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील वर्षावर दाखल
वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
साहेबांचा रस्त्यात खून करणार आहात तुम्ही, प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप, नितेश-निलेश राणेंसह पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन, अटक वॉरंट आणि नोंदी दाखवण्याची मागणी, जोपर्यंत नोंदी दाखवणार नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही, साहेबांच्या जीवाला धोका आहे, साहेबाला तुम्ही रस्त्यात मारणार आहात, खून करणार आहात, प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप
सॅच्युरेशन नॉरमल आहे, बीपी वाढलेला आहे, वय पाहता बीपी वाढला आहे, ते डायबिटीजचे पेशंट आहेत, ईसीजी आणि अॅडमिशन आवश्यक आहे. बीपी वाढल्यामुळे राणेंना रुग्णालयात अॅडमिट करावं लागेल, त्यानंतर पुढील ट्रीटमेंट द्यावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.
शिवसेनेने हा तमाशा बंद करावा, भाजपच्या कार्यालयाजवळ जे तमाशे चालू झाले तर भाजप महाराष्ट्रभर तांडव करेल, त्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहील. त्यानंतर मंत्री अनिल परब यांची क्लिपही व्हायरल झाली आहे. तालिबानींपेक्षाही भयंकर असं हे दिसतंय. मुळात राणे साहेबांनी स्वत: सांगितलं गुन्हा केला नाही, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
तुम्ही क्लिप दाखवताय, आमच्याकडे सीडी आहेत. सगळ्या सीडी मविआ नेत्यांच्या आहेत. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ना, ते एकमेकांवर गुन्हे दाखल करतील.
तुम्हाला अटक करायची असेल तर करा पण राणेसाहेबांना जेवण करु द्या, असं आम्ही पोलिसांना सांगितलं. त्यांचं जेवण झाल्यानंतर बीपी, शुगर चेक करणे आवश्यक होतं, त्यांना ECG करायचा होता, त्यांना काहीही करु दिलं नाही. भरल्या ताटावरुन नारायण राणेंना खेचलं, पोलिसांनी अजूनही अटक दाखवलेली नाही. माझा स्पष्ट आरोप आहे, राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे, असं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले.
नारायण राणे यांच्या अटकेनंतर जामिनासाठी धावाधाव, रत्नागिरी सत्र न्यायालयात याचिका दाखल, नारायण राणेंची सही घेऊन वकील न्यायालयात रवाना. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. अखेर पोलिसांनी रत्नागिरीत नारायण राणे यांना अटक केली. त्याआधी नारायण राणे यांनी कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता.
नारायण राणे यांना अटक केल्यानंतर पोलीस त्यांना घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. रत्नागिरी पोलिसांकडून नारायण राणेंचा ताबा नाशिक पोलिसांकडे देण्यात येणार आहे. नाशिक पोलीस नारायण राणे यांना कोर्टात हजर करतील अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी दिली होती.
स्थानिक एसपी आलेत, ते राणेसाहेबांना अटक करत आहेत, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नाही. एस पी म्हणतात आमच्यावर वरुन खूप दबाव आहे. पण आम्ही त्यांना अटक वॉरंट दाखवण्यास सांगत आहोत. त्यांच्याकडे वॉरंटच नाही. जोपर्यंत वॉरंट दाखवत नाहीत, तोपर्यंत कारवाई होऊ देणार नाही, असं प्रमोद जठार यांनी सांगितलं.
नारायण राणेंची तब्बेत बिघडली, बीपी-शुगर वाढली आहे, प्रमोद जठार यांची माहिती
राणेंवर कारवाई होईल असं वाटतं नाही, पण त्यांचं वक्तव्य हे सुसंस्कृत नाही. हा सगळा राजकारणाचा भाग आहे. संविधानिक नाही. जन आशिर्वाद यात्रेतील वक्तव्य हे राजकारण आणि त्यानंतरची कारवाईही राजकारणच आहे. हा लोकशाहीचा पराभव आहे. राणेंना रत्नागिरी कोर्टातच न्यावं लागेल. नारायण राणेंविरोधातील गुन्हा सिद्ध होणं फार अवघड आहे, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले.
राणेंना अटक झाली तरी तातडीने जामीन मिळेल. जामीन हा अधिकार असतो. त्यामुळे तो जामीन मिळू शकेल.
नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, त्यामुळे नारायण राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. रत्नागिरी कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याची वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्यामुळे आता राणेंना अटक करण्यात आली.
नारायण राणे यांच्यांवर रत्नागिरीत करावाई होईल, रत्नागिरी पोलीस राणे यांच्यावर अटकेची करावाई करतील आणि नाशिक पोलिसांकडे वर्ग करून नाशिक पोलीस कोर्टात हजर करतील अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी दिली होती. त्याप्रमाणे रत्नागिरी पोलिसांनी अटक करुन, नारायण राणे यांच्यावर कारवाई केली.
नारायण राणे समर्थक आणि युवा सैनिकांनी मध्ये हाणामारी झाली. यात चार शिवसैनिक जखमी झालेत. या शिवसैनिकांनी आरोप केलाय की पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला. त्यात आम्ही जखमी झालो. या जखमींची विचारपूस करण्यासाठी युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई आले होते. राणेंच्या बंगल्याचं संरक्षण करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुंड राणे समर्थक भाजपचे कार्यकर्ते म्हणून आले होते. या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी युवा सेनेने केली आहे. राणेंच्या बंगल्यात गेटच्या आत लपलेले जे गुंड आहेत. त्याचं सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांचा तपास करावा मागणी वरूण सरदेसाई यांनी केली आहे
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वाक्यानं मोठा वाद निर्माण झालाय. मुळात राणे साहेब हे बोलण्याच्या ओघात हे झालं असावं. पण मुख्यमंत्री स्वातंत्रदिन विसरतात तेव्हा कोणाच्याही मनात राग निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्रीपदाची गरिमा राखली पाहिजे. भारतीय जनता पक्ष राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नसेल पण पक्ष संपूर्णपणे, पूर्ण ताकदीनं राणेंसोबत आहे. ज्या पद्धतीनं कारवाई होतेय ही चुकीची आहे.
एखाद्याच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो, पण तो वेगळ्या पद्धतीने निषेध म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. हे सांगत असताना यामध्ये सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याचं बिलकुल समर्थन करु शकत नाही. एखाद्याने वासरु मारलं म्हणून आम्ही गाय मारु, असं सरकार वागत असेल तर एक गोष्ट सांगतो, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नसेल, पण भाजप पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठिशी उभा राहील आणि राहतोय.
खरं म्हणजे ज्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केलीय, मला आश्चर्य वाटतंय, शर्जिल उस्मानी महाराष्ट्रात येतो, भारतमातेला शिव्या देतो, हिंदुंना खुनी म्हणतो, त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता, आणि आज मात्र आख्खं पोलीस फोर्स नारायण राणेंवर कारवाईसाठी एक पोलीस पथक नाशिकहून, एक पुण्याहून निघालं आहे. कायद्याप्रमाणे हा कॉग्निजेबल ऑफेसन्स नाही, मी आयुक्तांचं पत्र वाचलं, मला आश्चर्य वाटतं, ते स्वत:ला छत्रपती समजतात का? की जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा. कोणत्या कायद्याने हा अधिकार दिला. मुळात हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, तुम्हाला आधी त्यांची बाजू ऐकावी लागेल, त्यानंतर कारवाई करावी लागेल,.
मात्र ज्याप्रमाणे पोलिसांचा गैरवापर सुरु आहे, महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला नितांत आदर आहे, पाच वर्ष मी काम केलं आहे. संपूर्ण देशात नि:पक्ष पोलीस म्हणून त्यांची ख्याती आहे. पण आता ज्या पद्धतीने त्यांचा ऱ्हास होत आहे, सरकार बस म्हटल्यावर हे लोटांगण घालत आहेत. केवळ सरकारला खूश करण्यासाठी पोलीस कारवाई करायला लागले तर महाराष्ट्राची प्रतिमा तशी राहणार नाही. आधीच या सरकारच्या काळात जी वसुली कांडं झाली आहेत, त्यामुळे प्रामाणिक पोलिसांबाबत नजर बदलली आहे.
अशा परिस्थितीत ज्या पद्धतीने सरकार पोलिसांचा वापर करत आहे, मला वाटतं पोलिसगिरी करत आहेत. प्रत्येकवेळी कोर्टाकडून चपराक बसत आहे. अर्णवपासून कंगनापर्यंत सर्व ठिकाणी चपराक बसल्या. हे जे चालू आहे ते योग्य नाही.
मी सल्ला देतो, कायद्याने काम करा, बेकायदेशीरपणे काम करणारे पोलीस सध्या कुठे आहेत ते मी सांगण्याची गरज नाही. एकाच ऑफेन्सला तीन तीन गुन्हे दाखल होतात, ही ताकद शर्जिल उस्मानीबाबत दाखवा,
पुन्हा सांगतोय राणे साहेबांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण सरकार पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर करत आहे ते पाहता भाजप राणेसाहेबांच्या पूर्ण पाठिशी आहेत.
शिवसैनिक दगडफेक करत आहेत, ते म्हणतात आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार, आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला केला तर आम्ही सहन करणार नाही.
आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही त्या त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करु. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही.
अवैधपणे राणे साहेबांना अटक केली तरी जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरु राहील. युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही, आणि आमच्यावर कारवाई.. हरकत नाही. आमची यात्रा थांबणार नाही.
ही जी कारवाई आहे ती अयोग्य आहे हे मी स्पष्टपणे सांगतो.
नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीत अटक होण्याची शक्यता, नाशिक पोलीस थेट रत्नागिरीत जाणार, चिपळूण न जाता थेट रत्नागिरीत जाऊन अटक करणार, सूत्रांची माहिती. एक तासापूर्वी नाशिक पोलिस पथक पुणे सोडल्याची माहिती.
दरम्यान, नाशिकमध्ये शिवसैनिकांनी नारायण राणेंचा पुतळा जाळला. शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केलं. यावेळी राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांचा सेना कार्यालया बाहेर तगडा बंदोबस्त
जयंत पाटील पत्रकार परिषद
नारायण राणे यांचं वक्तव्य निषेधार्य. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा वापरणे चुकीची. राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय, महाराष्ट्रात शिवसेनेनं जबाबदारीनं वागायचं काम केलंय, कायदा कोणाला हाती घेऊ देणार नाही. राष्ट्रवादी याचं कसलंही समर्थन करणार नाही. गृहखात्याला याबाबत जास्त माहिती आहे. विधानाकडे बघितलं तर परिस्थिती समजू शकतो, असं राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.
नारायण राणेंनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, ही अॅक्शनला रिअॅक्शन आहे, नारायण राणेंनी सुरुवात केलीय, बेजबाबदार वक्तव्याचे परिणाम येणारच, आम्ही शासन म्हणून कायदा अबाधित राखण्याचं काम आम्ही करु, पण कायदा बिघडवायची सुरुवात कोणी केली, कोण जबाबदार आहे हे निश्चित बघू, कायद्याप्रमाणे कारवाई करु, जनतेचा उद्रेक वाढला तर त्याला केवळ आणि केवल नारायण राणे हे जबाबदार आहेत, असं गृहराज्य मंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
पुणे : नारायण राणे यांच्या आर डेक्कन मॉलवरती शिवसैनिकांची जोरदार दगडफेक, नारायण राणेंच्या पोस्टरला महिला शिवसैनिकांनी मारले जोडे, नारायण राणेंनी मातोश्रीची माफी मागावी, पुण्यात नारायण राणेंना फिरू देणार नाही, महिला आघाडी राणेंविरोधात आक्रमक ,
नाशिक – भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमने सामने, सेना कार्यालयावर आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी, एकमेकांवर दगडफेक, पोलिसांसमोर झाली दगडफेक, दगडफेकीनंतर शहरात तणाव
नाशिक – भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमने सामने, सेना कार्यालयावर आलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी, एकमेकांवर दगडफेक, पोलिसांसमोर झाली दगडफेक, दगडफेकीनंतर शहरात तणाव, भाजप आणि सेनेच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे घेणार औरंगाबाद पोलीस आयुक्तांची भेट, नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी घेणार भेट, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत जाऊन घेणार भेट नारायण राणे यांच्या अटकेसाठी घेणार भेट.
चिपळूणमध्ये पोस्टर फाडलं
तिकडे रत्नागिरीतील चिपळूण बहादूर शेख नाका येथे शिवसैनिक आक्रमक. नारायण राणे यांचे पोस्टर फाडले तर किरकोळ दगड फेक.
पुणे : पुण्यात थोड्या वेळात युवा सेनेचं आंदोलन, पुण्यातील गुडलक चौकात करणार नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी, पोलीस आंदोलनस्थळी दाखल, थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात,
तळकोकणात शिवसैनिक आक्रमक
राणेंच्या विरुद्ध तळकोकणातील शिवसैनिक ही आक्रमक, कणकवली येथील संतप्त शिवसैनिकांची राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. शिवसैनिकांनी घेतली पोलीस अधिकाऱ्यांची भेट.गुन्हा दाखल झाला नाही तर राणेंची रॅली रोखण्याचा शिवसेनेचा इशारा.
विविध कलमांतर्गत नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचं विधान गंभीर आहे. त्याविरोधात तक्रार आली. तक्रारदारांची भावना दुखावल्याचं नमूद आहे. त्यामुळे नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे. कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. राणेंना अटक करुन न्यायालयात हजर केलं जाईल, न्यायालय जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल.
राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांना अटकेनंतर माहिती दिली जाईल. संबंधित जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी त्यांना माहिती दिली जाईल. राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांनाच संविधानात क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना मुभा नाही. या केसमध्ये फॅक्ट ऑफ द केस पाहून ही कारवाई करण्यात येत आहे.
गुन्ह्याचं गांभीर्य पाहून माननीय साहेबांना पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून अटकेसाठी पथक रवाना झालं आहे. आदेश अटकेचे दिले आहेत. अटक करणे हा महत्त्वाचा भाग नाही, पुनरावृत्ती होऊ नये हे महत्त्वाचं आहे. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावं.
नारायण राणे काय म्हणाले?
मला तुम्हाला सांगायचं आहे, माहिती अभावी मी एकही उत्तर देणार नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झालाय याची माहिती मला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा, मग आपआपल्या टीव्हीवर दाखवा, नायतर तुमच्याविरोधात माझी केस दाखल होईल. गुन्हा दाखल नसताना, उगाच उटक होणार वगैरे काय नॉरमल माणूस वाटलो काय तुम्हाला? कोणाचं म्हणणं आहे, शिवसेना वगैरे म्हणता, नाव सांगा, कोण शिवसेना? बडगुजर कोण मी ओळखत नाही.
मी बातमीवर विश्वास ठेवणार नाही. मला माहिती मिळाल्यावर आम्ही समर्थ आहोत. दगड मारुन जाणं हा पुरुषार्थ नाही. आम्ही पाहू, काय पुरुषार्थ आहे. ज्यावेळेला शिवसेनाभवन फोडू असं म्हणाल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले थोबाड फोडू, हा क्राईम नाही का? त्यावेळी का गुन्हा नाही?
15 ऑगस्ट हा वर्धापन दिन हा माहिती नाही मुख्यमंत्री असताना, मी म्हणालो त्याने मागे सेक्रेटरीला विचारावं. आणि त्यावेळी मी असतो तर.. असतो तर हा क्राईम नाही. मी आता कानफाड फोडीन हा क्राईम आहे. मी पण कॅबिनेट मंत्री आहे देशाचा. देशाचा अमृत महोत्सव माहिती नाही हा राष्ट्रद्रोह आहे.
आम्ही नागरिक आहोत, बॅनरबाजी करु. मी तुम्हाला मीडियाल उत्तर देण्यास बांधिल नाही.
कोण शिवसेना, समोर उभंतरी राहावं.. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं.
आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे यात्रा होणार
राणेसाहेब रत्नागिरीतील यात्रा सुरु करत आहेत, हे सरकार देशद्रोही आहे का, देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं संरक्षण करणार का? देशाला किती वर्ष झाली स्वातंत्र्याला हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही हा देशाचा अपमान आहे. लवकरात लवकर उद्धव ठाकरेंनी माफी मागावी. हे सरकार हिंदू विरोधी आहे हे ऐकलं होतं, आता देशविरोधी हे सरकार आहे का. उद्या देशाच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तीलाच तुम्ही अटक करणार का? राणेसाहेबांनी चुकीचं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर प्रतिक्रिया दिली. हे सरकार देशद्रोही सरकार आहे का? – नितेश राणे
नाशिक : शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर हल्ला केला. नाशिकच्या भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक केली. यावेळी शिवसैनिकांनी नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी केली.
नारायण राणे अटकपूर्व जामिनाच्या तयारीत, हायकोर्टात जामीन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु, नारायण राणेंची वकीलासोबत बैठक, लीला सुरुवात करण्यापूर्वी नारायण राणे वकिलांचा सल्ला घेणार, अॅडव्होकेट संजय चिटणीस हॉटेल रीम्झवर दाखल
नारायण राणेंची वकीलासोबत बैठक सुरु, रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी नारायण राणे वकिलांचा सल्ला घेणार, अॅडव्होकेट संजय चिटणीस हॉटेल रीम्झवर दाखल
नारायण राणेंचा माज उतरवू, त्यांच्या घरात घुसून शिवसैनिक काय असतो हे दाखवून देऊ. विरोधी पक्षाने केवळ भुंकण्यासाठी सोडलं आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करता, यापुढे अशी भाषा केली तर घरात घुसून तुम्हा हिसका दाखवू, असं शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.
नारायण राणे यांच्या अटकेसाठी दोन पथकं रवाना झाली आहेत. नाशिक पोलिसांचं एक पथक चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. तर पुण्यातील युवासेना पदाधिकारी रोहित कदम यांच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांचं पथकही चिपळूणकडे निघालं आहे. दोन्ही पथक चिपळूणला पोहोचून नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रमोद जठार काय म्हणाले?
दौरा होणार आहे, थोड्याच वेळात राणेसाहेब निघतील. दौरा योग्य प्रकारे 27 तारखेला सिंधुदुर्गात समाप्त होईल. राहिला प्रश्न मीडियातील बातम्यांचा. सरकार सूडबुद्धीने काम करत आहे. कालच्या दौऱ्यात आम्ही हॉल किंवा जागा निश्चित करत होतो, त्या जागाही मिळत नव्हत्या. राणेसाहेबांचा आज आणि उद्या रत्नागिरीची दौरा असताना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची मुद्दाम बैठक लावली. ते राणे साहेबांच्या बैठकीला जाऊ नयेत म्हणून. नारायण राणे जे बोलले ते ठाकरी भाषेत बोलले. या ठाकरी भाषेवर गुन्हा दाखल करायचे असतील तर प्रत्येक दसरा मेळाव्यातील भाषणावर गुन्हा दाखल करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी ठाकरे भाषेत उत्तर द्यावं.
स्वातंत्र्य दिन कधी आहे हे मुख्यमंत्र्यांनी विचारणं म्हणजे अपमान आहे. त्याला राणेंनी ठाकरी भाषेत उत्तर दिलं. आता मुख्यमंत्र्यांनी ठाकरी भाषेत उत्तर द्यावं. मुख्यमंत्र्यांनी देशाचा अपमान केला, त्याला राणेंनी उत्तर दिलं. ठाकरी भाषेत उत्तर द्या. दसरा मेळाव्यात अशी वक्तव्य केली होती.. आर आर पाटलांनी कोपरा पासून ढोपरापर्यंतची भाषा केली होती. त्यामुळे उत्तर द्यायचं असेल तर ठाकरे भाषेत द्या.
राणेसाहेब किंवा भाजपला शिवसेना किंवा सरकार रोखू शकत नाही. जन आशिर्वाद यात्रा संपूर्ण हिंदुस्थानात फिरत आहे. राणेसाहेब 70 पेक्षा जास्त वयाचे असताना पूरग्रस्तांपर्यंत पोहोचत आहेत. राणेसाहेबांना घाबरत आहे. राणे साहेबांना अटक झाली तर भाजपचे सर्व कार्यकर्ते अटक करुन घेतल्याशिवाय राहणार नाही.
राणेंना अटक होत नाही. अटक कऱण्याची हिम्मत नाही. सरकारने धाडस दाखवावं.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे. राणेंची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील.
प्रत्येकाची स्टाईल असते, त्यात व्यक्तीगत आसूया नसते. पण अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक करण्याची ही पहिलीच वेळ असू शकते.
मी त्याचं समर्थन करत नाही. कोकणात शिव्यांशिवाय बोलणंच पूर्ण होत नाही. ते आसूयेपोटी नसतं, रागापोटी नसतं.
राणे मारतो म्हणाले नाहीत, मारणार आहे ही धमकी असते, न्यायालयात ही गोष्ट टिकणारच नाही. राणे तसे म्हणालेच नाहीत. मी असतो तर असं ते म्हणाले.
स्वत: उद्धवजींनी दसऱ्याला केलेलं भाषण बघा, राजकारणात भाषा सांभाळून वापरावी हे खरं आहे. त्यामुळे अशा एखाद्या वक्तव्यावरुन टोक गाठणं चुकीचं आहे. उद्धवजींची भाषणं काढा.
नाशिक पोलीस आयुक्तांनी काढलेले आदेश म्हणजे हास्यास्पद आहे. मला वाटतं आणखी काही घडणार असेल तर ते डायवर्ट करण्याचा प्रयत्न आहे. केवळ उद्धवजींचा भाषणाचा उल्लेख हे वैयक्तिक आहे. शब्द जपून वापरलं पाहिजे हे खरंय, मग हे सगळ्यांनाच लागू आहे.
जन आशिर्वाद यात्रा निघणार. न्यायालयात हे दोन सेकंदात उडणार. हे सगळं भीती पोटी झालं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात राणे साहेब जात आहेत. कोकणात शिवसेनेचं वर्चस्वाला हादरा बसत आहे.
नारायण राणेंना अटक होईल असं वाटत नाही. न्यायालय योग्य निर्णय देईल. यात्रा सुरु राहील. दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले तर ही जबाबदारी प्रशासनाची. एखाद्या वाक्यावरुन टोक गाठायचं असेल तर शासनाच्या मनात असंतोष निर्माण करण्याचं आहे हे दिसतंय.
माजी खासदार निलेश राणे यांचं ट्विट, आम्हाला काडीभर फरक पडत नाही, समोर येऊन दोन हात करा, निलेश राणे यांचं आव्हान.
कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.
कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 24, 2021
नारायण राणे यांच्या विरोधात औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक, नारायण राणे यांच्या विरोधात औरंगाबादेतही गुन्हा दाखल होणार, शिवसेना आमदार अंबादास दानवे राणेंविरोधात तक्रार देणार, क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करणार, गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी अंबादास दानवे ठिय्या आंदोलन करणार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “भाजपची रणनीती लोकांना समजते आहे. भाजप काहीही करु शकते. एकीकडे केंद्रीय मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात मारण्याची भाषा करतात. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असताना दहीहंडी सण साजरा करणार असं सांगतात.”
भान हरवलेले नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे
VIDEO : Gulabrao Patil | भान हरवलेले नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे #GulabraoPatil #Shivsena #Hospital pic.twitter.com/MNSDnUPsC2
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 24, 2021
नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश, मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्यानंतर राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल, युवासेनाही आक्रमक
LIVETV – नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश, मुख्यमंत्र्यांविरोधातील वक्तव्यानंतर राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल, युवासेनाही आक्रमक https://t.co/ImprYhMJl7 #NarayanRane pic.twitter.com/sy77P02QFI
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 24, 2021
मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नाशकात गुन्हा दाखल, अटकेचे आदेश
VIDEO : Nashik | मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नाशकात गुन्हा दाखल, अटकेचे आदेश#Nashik #CM #UddhavThackeray #NarayanRane @MeNarayanRane @OfficeofUT @ShivSena @BJP4Maharashtra pic.twitter.com/MuVa0a5JEp
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 24, 2021
मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, नारायण राणेंना अटक करा, नाशिक पोलीस आयुक्तांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, नारायण राणेंना अटक करा, नाशिक पोलीस आयुक्तांचे निर्देश https://t.co/SzRSEiRQcl #NarayanRane | #CMUddhavThackeray | #Nashik
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 24, 2021