बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं; राणेंचा हल्लाबोल

| Updated on: Aug 20, 2021 | 11:08 AM

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं होतं. (narayan rane slams cm uddhav thackeray over Balasaheb Thackeray memorial)

बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं; राणेंचा हल्लाबोल
Narayan Rane
Follow us on

मुंबई: केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं होतं. नारायण राणे यांनी आज या प्रकारावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना प्रमुखांच्या स्मृती स्थळाची अवस्था आधी पाहा. स्मृती स्थळ दलदलीत आहे. आधी ते पाहा. मग शुद्धीकरण करा. गोमूत्रं शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतचं मन शुद्धीकरण करा, असा हल्ला नारायण राणे यांनी चढवला. (narayan rane slams cm uddhav thackeray over Balasaheb Thackeray memorial)

नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघाती टीका केली. फक्ता गोमूत्रं आणि गोमूत्रं या एकाच विषयासाठी आलो आहोत का? मला कुणाला नमस्कार करावा वाटतो, कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. ते गोमूत्रं ज्यांना शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या. ज्यांना प्यायचं त्यांना पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध आहे. ज्यांनी शिंपडलं त्यांना विचारा. काय दुषित झालं होतं. एवढं जर स्मारकाचा अभिमान असेल ना ते स्मारक ज्या स्थितीत आहेत. तिथे जाऊ शकत नाही. पँटवर करून मी आत गेलो. दलदलीत ते स्मारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत. अनेक स्मारकं मी पाहिलं. अत्यंत सुशोभित असतात. लॉन आहे. फुलझाडं आहेत. इथे काय आहे. इथे तर फोटोही साहेबांचा दिसत नाही. जे गोमूत्रं शिंपडायला आले ना त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करावा. गोमूत्रं शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतचं मन शुद्धीकरण करा. मग कारभार करा, असं राणे म्हणाले.

मी असतो तर अडवलं असतं

राणेंना येऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. पण मी पोहोचलो. तिथे कुणीही नव्हते. उद्धव ठाकरेही नव्हते. मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं. हे काय आहे. पाच सहा जणांना दोनशे दोनशे रूपये देऊन शुद्धीकरणासाठी पाठवलं. तिथे ब्राह्मण हवा होता शुद्धीकरणासाठी आमच्याकडे भरपूर आहे. आम्ही घेऊन गेलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

लगे रहो

राणे यांनी काल लालबागच्या रॅलीत आपलं पद हे शेवटचं पद आहे, असं म्हटलं होतं. त्यावर राणेंनी आज खुलासा केला. मी मंत्री म्हणूनच राहणार आहे. हे शेवटचं पद आहे, म्हणजे संपलं नाही. हे शेवटचं नाही. लगे रहो, असं राणे म्हणाले.

तुमच्या डोक्यावर कोण तरी बसलंय हे लक्षात ठेवा

रॅलीतील अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावरूनही त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली. मला काही फरक पडत नाही. 7 गुन्हे दाखल करा, 70 करा की 70 हजार गुन्हे दाखल करा. मी समर्थ आहे. ज्यांच्यावर गुन्हे झाले त्यांच्या पाठी राहायला मी समर्थ आहे. ही वृत्ती चुकीची आहे. आम्ही जन आशीर्वाद घ्यायला फिरतोय. लोकांच्या समस्या घेण्यासाठी फिरतोय. तुम्ही मिटिंगा घेतल्या, सभा घेतल्या तेव्हा कोरोना नाही झाला. आताच कोरोना होत आहे का? असा सवाल करतानाच तुम्ही गुन्हे दाखल करताना तुमच्या डोक्यावर कोण तरी दिल्लीत बसलं आहे हे लक्षात ठेवा. आम्ही वर आहोत तुम्ही खाली आहात, असा इशाराही त्यांनी दिला.

ते सुडबुद्धीने वागले तर आमचा फायदा होईल. महाराष्ट्रातील जनता सुडबुद्धीने वागणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. मुंबईत भाजपची सत्ता येणं गरजेचं आहे. आम्ही जागतिक दर्जाचं शहर करू. विकास करू. कालच वाटलं भाजपचा भगवा फडकेल. काल वाटलं म्हणून सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेतली. कारण सकाळी पत्रकार परिषद घेणं शुभ असतं, असं ते म्हणाले.

 

सर्व ओपन करेल

यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार संजय राठोड प्रकरणावरूनही सरकारला धारेवर धरलं. राठोड संत आहे का? एक झालं, दोन झालं, काय लावलं काय? गुन्हे काय मोजताय? अरे कार्य मोजायची असतात. हे गुन्हे मोजत आहेत. त्यांना आधी म्हणा सुधारा. शिवसैनिक कसे वागतता. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी कसे वागतात हे मला सर्व माहीत आहे. मला सांगायची गरज नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा सर्व ओपन करेल. ती वेळ आणू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

राऊतांना ओळख करून देईल

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मी राणेंना ओळखत नाही, असं विधान केलं होतं. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. एक दिवस त्यांना ओळख करून देईल. जवळ बोलवेन आणि ओळख करून देईल, असा चिमटा राणेंनी काढला. (narayan rane slams cm uddhav thackeray over Balasaheb Thackeray memorial)

 

संबंधित बातम्या:

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर नारायण राणेंनी काय आशीर्वाद मागितला?; राणेंनी केला मोठा खुलासा

सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती, पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही : अजित पवार

मुख्य मैदानावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रातोरात समर्थकांनी दुसरं मैदान बनवलं, गोपीचंद पडळकरांचा ‘गनिमी कावा’ यशस्वी!

(narayan rane slams cm uddhav thackeray over Balasaheb Thackeray memorial)