मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील कट्टरता संपूर्ण राज्याला माहिती आहे. मात्र, अशास्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या मित्राला राज्य मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची राज्याच्या सहकार परिषदेवर अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे अनास्कर यांना आता राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. अनास्कर हे उच्चशिक्षित असून, गेल्या 30 वर्षांपासून राज्याच्या सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. (Vidyadhar Anaskar has been appointed as the chairman of the state co-operative council)
अनास्कर यांनी सहकार क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. अनास्कर हे सध्या सहकारी बँकेवर प्रशासक आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्य सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. राज्यातील सरकार बदलल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारनं त्यांना प्रशासक म्हणून कायम ठेवलं.
विद्याधर अनास्कर हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जवळचे मित्र आहेत. राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अनास्कर यांचा आदराने उल्लेख केलाय. राणेंचे मित्र असल्या कारणाने अनास्कर यांना राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक पदावरुन पायउतार केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचं काम पाहून राज्य सहकारी बँकेवर त्यांना कायम ठेवलं. इतकंच नाही तर आता अनास्कर यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी केली आहे.
1. सहकारी चळवळीशी संबंधित सर्व बाबींवर राज्य सरकारला सल्ला देणं
2. सहकारी चळवळीचा आढावा घेणं, राज्यातील सहकारी संस्थांच्या कार्याचा समन्वय साधण्याचे मार्ग सुचविणे
3. सहकारी संस्थांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्ग आणि उपाय सुचविणे
4. राज्य सरकार परिषदेकडे निर्देशित करेल अशा सर्व बाबींवर राज्य सरकारला अहवाल देणे
5. राज्यातील सहकारी चळवळीच्या विकासाबाबतच्या योजना आणि धोरणे यांची शिफारस करणे
6. समाजातील मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या सहकारी चळवळीचा विकास करण्यासाठी असलेल्या विद्यमान योजनांचे मुल्यांकन करणे व नवीन योजना सुचविणे
7. सहकारी पध्दतीद्वारे आर्थिक विकास करण्याच्या विशेष परियोजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला सल्ला देणे
8. विभागामार्फत किंवा खास स्थापन केलेल्या मंडळामार्फत उपरोक्त कोणत्याही प्रयोजनासाठी अभ्यास करण्याचं काम हाती घेणे
VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 7 August 2021https://t.co/vTgmXdetoL | #50SuperFastNews | #UddhavThackeray | #TejasThackeray #Maharashtra | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 7, 2021
इतर बातम्या :
Vidyadhar Anaskar has been appointed as the chairman of the state co-operative council