2017 निवडणुकीत 31 प्रभाग होते आता 44 आहेत. वॉर्ड क्रमांक 28 मध्ये गेल्या निवडणुकीत (Elections) १ ठिकाणी भाजप आणि ३ ठिकाणी शिवसेना निवडून आली होती. असं असलं तरी भाजपने 122 पैकी 67 जागांवर विजय मिळवत नाशिक महापालिकेवर झेंडा फडकवला होता. यंदा राज्यातील बदललेली राजकीय स्थिती महानगरपालिकेच्या (NMC) निवडणुकीवर काय परिणाम करते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या वॉर्डाची एकूण लोकसंख्या 30485 आहे. गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत गुंडांना पक्षात देण्यात आलेला प्रवेश, तिकीटासाठी पैसे घेतल्याचा झालेला आरोप आणि त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप्स यामुळे भाजप नाशिकमध्ये वादग्रस्त ठरला होता. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिकमध्ये (Nashik BJP) जोरदार मुसंडी मारली आणि नाशिकची सत्ता काबीज केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाशिकमध्ये एकत्र निवडणूक लढवली. मात्र या दोन्ही पक्षांना एकत्रित मिळून जेमतेम दोन आकड्यांपर्यंत मजल मारता आली. या सगळ्यामुळे यंदाची नाशिक महानगरपालिकेची निवडणूक खूप महत्त्वाची आहे.
व्याप्ती :- शिवाजी वाडी, भारत नगर, घरकुल, नंदीनी नगर, रॉयल कॉलनी, रहेनुमा नगर, गुलशन कॉलनी, हरी संकुल सोसायटी परिसर, नारायणी हॉस्पिटल, पायोनिअर हॉस्पिटल. डी.जी.पी. नगर नं. 1. टागोर नगर, कल्पतरु नगर.
उत्तर :- जुना मुंबई नाका राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 नंदिनी नदी पुलापासुन नंदिनी नदीने पुर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन श्रीदर्शन अपार्टमेंट घेऊन वैद्यनगर पुलापर्यंत व तेथुन कॉलनी रस्त्याने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन नंदादिप बंगल्यापर्यंत. व तेथुन कॉलनी रस्त्याने पुर्वेकडे दक्षिणेकडील भाग घेऊन कानडे निवास लक्ष्मी माता मंदिरापर्यंत व तेथुन कॉलनी रस्त्याने पुर्वेकडे नाशिक पुणे महामार्ग बजरंग वाडी नाल्यावरील पुलापर्यंत.
पूर्व :- नाशिक पुणे महामार्ग बजरंगवाडी नाल्यावरील पुलापासून महावीर मार्बल घेऊन नाशिक पुणा रोडने दक्षिण पूर्व दिशेने पश्चिमेकडील भाग घेऊन डी जी पी नगर बाजुच्या मिलीटरी हद्दीपर्यंत.
दक्षिण :- नाशिक पुणे रोड पासून डी.जी.पी. नगर बाजुच्या मिलीटरी हद्दीने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन पुढे कॅनॉल रोडने उत्तरेकडील भाग घेऊन राजमुद्रा अॅव्हेन्यु अपा. पर्यत व तेथुन विठ्ठल मंदिर रस्त्याने पुर्वेकडे मी18 रुंद डी.पी. रस्ता (पखाल रोडपर्यंत) व तेथुन पखाल रोडने उत्तरेकडे पुर्वेकडील भाग घेऊन 30 मी रुंद डी.पी. रस्त्यावरील होंडा शोरुम पर्यत. व तेथुन 30 मी रुंद डी. पी. रस्त्याने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन वडाळारोड पर्यंत व तेथुन 30 मी रुंद डी.पी. रस्त्याने उत्तरेकडे पुर्वेकडील भाग घेऊन पॅराडाईज गार्डन पर्यत व तेथुन वडाळा पाथर्डी रस्त्याने दक्षिणेकडे पश्चिमेकडील भाग घेऊन न्यु विनय किराणा दुकाना पर्यंत तेथुन दिपाली नगर रस्त्याने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन चंद्रकिरण सोसायटी पर्यत व तेथुन कॉलनी रस्त्याने दक्षिणेकडे गुरुकृपा बंगला घेऊन व तेथुन पश्चिमेकडे कॉलनी रस्त्याने उत्तरेकडील भाग घेऊन सेजल पार्क पर्यंत व तेथुन बॉक्स नाल्यावरील रस्त्यापर्यंत व तेथुन उत्तरेकडे दिपाली नगर रस्त्यापर्यंत व तेथुन दिपाली नगर रस्त्याने पश्चिमेकडे उत्तरेकडील भाग घेऊन मुंबई आग्रा महामार्ग सव्र्हस रस्त्यापर्यंत.
पश्चिम :- मुंबई आग्रा महामार्ग क्र. 3 सव्र्हस रस्ता व दिपाली नगर रस्ता यांचे चौका पासून सव्र्हस रस्त्याने उत्तरेकडे पुर्वेकडील भाग घेऊन जुना मुंबई नाका राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 नंदिनी नदी पुलापर्यत.
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
राष्ट्रवादी | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
राष्ट्रवादी | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी/ आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
राष्ट्रवादी | ||
इतर |
28 अ सुर्यवंशी दत्तात्रय ग्यानदेव -शिवसेना
1, अमी रो-हाऊस, बुरकूले हॉल मागे, अंबड, नाशिक.
28 ब पवार प्रतिभा बाळासाहेब -भाजप
प्लॉट नं.9, वैदेही अपार्टमेंट, संत जनार्दन स्वामी नगर, नाशिक.
28 क मटाले सुवर्णा दिपक -शिवसेना
शिवप्रभाग, आयटीआय, अंबड लिंकरोड, आनंदनगर, कामटवाडे, नाशिक..
28 ड दातीर दिपक निवृत्ती – शिवसेना
घ.नं.463/ए, प्रणय स्टॅपिंग कंपनी मागे, नाशिक.
नाशिकमधील सत्तेचा कुंभ कोणाकडे असणार, याचे उत्तर नाशिककरांनी दिलं. राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांना नाशिककरांनी संधी दिली. 2017 साली भाजपने 122 पैकी 67 जागांवर विजय मिळवत नाशिक महापालिकेवर झेंडा फडकवला. तर त्याही आधीच्या निवडणुकीत तब्बल 40 जागांवर विजय मिळवणाऱ्या मनसेला फक्त 5 जागांवर यश मिळाले. तर शिवसेनेला 34 जागा जिंकण्यात यश आले.