नाशिक: नाशिक (Nasik) महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत (nmc election 2022) प्रभाग 13 वर भाजपचं वर्चस्व होतं. तर प्रभाग क्रमांक 14मध्ये राष्ट्रवादीचं होतं. प्रभाग 14 मधील चारही वॉर्डात राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले होते. मात्र, यावेळी तीन वॉर्डांचा एक प्रभाग असणार आहे. या तीनमध्ये एक प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आणि एक वॉर्ड महिला राखीव झाला आहे. त्याशिवाय मतदारसंघाची फेररचना झाली आहे. जुना प्रभाग क्रमांक 14 आता राहिला नाही. नव्या प्रभाग क्रमांक 14मध्ये अनेक नवे विभाग आले आहेत. त्यामुळे पूर्वी निवडून आलेल्या चारही नगरसेवकांना आपल्या सोयीचा मतदारसंघ निवडावा लागणार आहे. त्यामुळे सेफ मतदारसंघ शोधण्यासाठी नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. भाजप (bjp), काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेनेतही तेच चित्रं दिसत आहे.
गेल्या निवडणुकीत म्हणजे 2017च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14मधील चारही वॉर्डात राष्ट्रवादीचे चारही नगरसेवक निवडून आले होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जातो. प्रभाग 14 अ मधून शोभा साबळे, समिना मेमन, ब मधून मुशीर सैय्यद आणि क मधून सुफी जीन निवडून आले होते. म्हणजे या वॉर्डात दोन महिला आणि दोन पुरुष निवडून आले होते.
प्रभाग क्रमांक 14 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
मागच्या वेळी चार वॉर्डांचा एक प्रभाग होता. आता तीन वॉर्डाचा एक प्रभाग आहे. त्यामुळे यावेळी मागच्यावेळी जिंकून आलेल्या फारच कमी नगरसेवकांना लढण्यासाठी संधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 14 अ हा वॉर्ड अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाला आहे. ब वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. तर ड वॉर्ड हा जनरल झाला आहे. म्हणजेच पुरुषांना एकाच वॉर्डातून लढण्यास संधी मिळणार आहे. तर स्त्रियांना दोन वॉर्डातून निवडणूक लढण्यास संधी मिळणार आहे. तसेच अनुसूचित जातीच्या उमेदवारालाही अ वॉर्डाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.
प्रभाग क्रमांक 14 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
या मतदारसंघाची लोकसंख्या 33 हजार 158 इतकी आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4758 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2295 इतकी आहे.
प्रभाग क्रमांक 14 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
नव्या प्रभागात सातपूर गांव भाग,जाधव संकुल, समता नगर, पपया नर्सरी, निलकंठेश्वर नगर आणि महादेववाडीचा समावेश आहे.
भाजप- 67
शिवसेना- 34
काँग्रेस- 6
राष्ट्रवादी – 6
मनसे 5
एकूण-122