मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका (Election) आता तोंडावर आल्याने सर्वच राजकिय पक्षांचे उमेदवार कामाला लागलेत. नवी मुंबई महापालिकेत एकूण 122 नगरसेवक असून एकूण 41 प्रभाग आहेत. महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग 40 आहेत. तर दोन सदस्यीय प्रभाग एक आहे. यंदाच्या निवडणुकीत नवी मुंबईत (Navi Mumbai) अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 2 आणि महिलांसाठी 61 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेची (Municipality) एकूण लोकसंख्या 11,20,547 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,00,067 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 18,913 एवढी आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 च्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरवेळी इथे काट्यांची टक्कर बघायला मिळते. यंदा निवडणूकीमध्ये नेमके काय होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
नवी मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तर अभिजित बांगर हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत. नवी मुंबई महापालिका हा भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे. यापूर्वी गेल्या सहा निवडणुका वॉर्ड निहाय झाल्या आहेत. यामुळे उमेदवारांसमोर हे एक मोठे आवाहनच असणार आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजपाची जरी सत्ता असेल तरीही यंदा आपला गड कायम ठेवण्यासाठी भाजपाला मोठी मेहनत करावी लागणार हे नक्कीच आहे.
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
अॅड. अपर्णा नवीन गवते या प्रभाग क्रमांक नऊच्या नगरसेविका आहेत. प्रभाग क्रमांक 9 ची एकून लोकसंख्या 25092 आहे. पश्चिम हद्दीपासुन मुलुंड- ऐरोली रस्त्याने दिवा गाव सर्कलपर्यंत व तेथून उत्तरेस भूखंड क्र. 6 यशश्री सोसायटी (वेलकम स्विट) पर्यंत तेथुन पुर्वेस दत्ता मेघे वर्ल्ड अकाडमी शाळेच्या मैदान पर्यंत, तेथुन दक्षिणेस अण्णासाहेब पाटील उद्यानातून सुंदरम अपार्टमेंट रूम नं. 185 च्या मागील सर्विस गल्ली ने. ऐरोली मुलूंड रस्त्यापर्यंत, तेथुन पूर्वेस | शिवशंकर प्लाझा सोसायटी से. 6 मुख्य (सिग्नल) पर्यंत
भाजपा | ||||
---|---|---|---|---|
शिवसेना | ||||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
काँग्रेस | ||||
अपक्ष |
पूर्व-मुलंड-ऐरोली रस्त्याच्या शिवशंकर प्लाझा सोसायटी से. 6 जंक्शन पासुन दक्षिणेस सरळ रस्त्याने गोठीवली-रबाले गाव नाल्यापर्यंत. दक्षिण नमुमपाच्या पश्चिम हद्दीपासुन जय ओमकार सोसायटीला पुर्वस वळसा घालून स. 10 ऐरोली कडील रस्त्याने सिग्निया हाइटपर्यंत, दक्षिणेस गोठीवली नाल्यापर्यंत व त्या नाल्याने मदिन स्कूल शाळेच्या मैदानाच्या जंक्शनपर्यंत साधारण प्रभाग आहे. यंदा प्रभागातून नेमके कोण निवडून येते हे बघण्यासारखेच ठरणार आहे.