नवनीत राणा अमरावतीतून लढणार, स्वत: पवार प्रचाराला येणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीत सहभागी करुन घेतले आहे. त्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर नवनीत राणा अमरावतीतून शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना आव्हान देतील आणि यासाठी नवनीत राणांना आघाडीचाही पाठिंबा असेल. “नवनीत […]

नवनीत राणा अमरावतीतून लढणार, स्वत: पवार प्रचाराला येणार
Follow us on

मुंबई : आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीत सहभागी करुन घेतले आहे. त्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर नवनीत राणा अमरावतीतून शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना आव्हान देतील आणि यासाठी नवनीत राणांना आघाडीचाही पाठिंबा असेल.

“नवनीत राणा निवडणूक लढणार असून, पाच वर्षे काम करत आहेत. अमरावतीच्या विकासासाठी पवारांनी साथ दिली. त्यासाठी त्यांचे आभार. शरद पवार येऊन प्रचार करणार आहेत. अडसूळ फक्त निवडणुकीत दिसतात, त्यामुळे नवनीत राणा विजयी होतील. पवार साहेबानी मोठं मन करुन आम्हाला जागा सोडली.”, अशा भावना नवनीत राणांचे पती आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केल्या.

“नवनीत राणा यांना पवार आणि कॉग्रेसने आशीर्वाद दिला. ही मोठी ताकद आहे. शरद पवार बरोबर आहेत, ते जे निर्णय घेतील त्यांच्याबरोबर राहू.”, असे रवी राणा म्हणाले.

“मी अपक्ष निवडून आल्यावर यावेळी भाजपला पाठिंबा दिला. अपक्ष आमदाराला सरकार बरोबर राहावं लागतं. मात्र गेल्यावेळी मी आघाडी बरोबर होतो. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही.”, असेही रवी राणा म्हणाले.

कोण आहेत नवनीत राणा?

अमरावतीतल्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या नवनीत राणा या पत्नी आहेत. सिनेमा, मॉडेलिंगनंतर रवी राणा यांच्याशी लग्न केले आणि त्यानंतर त्या राजकारणात उतरल्या. 2014 साली अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना नवनीत राणा यांना टक्कर दिली होती.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.