“क्रांती रेडकर यांची बहीण ड्रग्ज व्यवसायात आहे का?” नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

| Updated on: Nov 08, 2021 | 9:40 AM

समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा, असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे म्हणून सादर केले आहेत. 

क्रांती रेडकर यांची बहीण ड्रग्ज व्यवसायात आहे का? नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
क्रांती रेडकर, समीर वानखेडे, नवाब मलिक
Follow us on

मुंबई : अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मेहुणीवर हल्लाबोल केला आहे. समीर वानखेडेंची पत्नी- अभिनेत्री क्रांती रेडकर यांची बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर (Harshada Dinanath Redkar) या ड्रग्जच्या व्यवसायात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नुकतेच समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांनी मुंबई उच्च न्यायालयात मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. त्यानंतरही नवाब मलिक यांच्याकडून आरोपांची सरबत्ती सुरुच आहे.

समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा, असं लिहित नवाब मलिक यांनी ट्विटरवर काही कागदपत्रे पुरावे म्हणून सादर केले आहेत.

काय म्हणाले नवाब मलिक?

नवाब मलिक यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणात आणखी काही गौप्यस्फोट केले होते. हे ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘संगम’ या दोन इंटरव्हलचे पिक्चर नाहीत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही. ललित हॉटेल सात महिने बुक होते. तिथूनच प्रायव्हेट आर्मी काम करत होती. विलास भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसूजा असे अनेक जण येत होते. तिथे मुलीही येत होत्या. तिथे ड्रग्जही घेतलं जात होतं. ललितमध्ये शबाब आणि कबाब सुरु होते. फक्त नवाब नव्हता. हे सर्व तुमचेच लोक होते. समीर वानखेडेंच्या प्रवक्त्यानेच ती माहिती दिली, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता.

जाती-धर्मावरुन वाद

नवाब मलिक यांनी वानखेडे यांची जात आणि कथित धर्मांतरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मीडियाशी संवाद साधला होता. मी अनुसूचित जमाती वर्गातील आहे आणि माझा मुलगाही अनुसूचित जमाती वर्गातील आहे. मी मुस्लिम महिलेशी लग्न केलं. पण मुस्लिम धर्माशी आमचा काहीच संबंध नाही, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे, समीर वानखेडे मुस्लिम असल्यानेच त्यांच्याशी माझ्या मुलीने लग्न केल्याचा दावा समीर वानखेडे यांच्या पहिल्या बायकोच्या वडिलांनी केला आहे.


संबंधित बातम्या :

व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा

नवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा, समीर वानखेडेंच्या वडिलांकडून 1.25 कोटींची मागणी

मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप