मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधातील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. नवाब मलिक यांनी यापूर्वी या प्रकरणातील काही व्हॉट्सअप चॅट उघड केले होते. त्यानंतर आता मलिक यांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या के. पी. गोसावीच्या काही ऑडिओ क्लिप्स जाहीर केल्या आहेत. यात गोसावी एका अज्ञात व्यक्तीशी मोबाईलवर संभाषण करत आहे. (Audio clip of KP Gosavi and an unknown person released by Nawab Malik on Twitter )
मलिक यांनी यापूर्वी के. पी. गोसावीचे व्हॉट्स अप चॅट उघड केलं होतं. आता मलिकांनी जाहीर केलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मलिक यांनी गोसावीच्या एकूण 4 ऑडिओ क्लिप ट्विटरवर पोस्ट केल्या आहेत. त्यात के. पी. गोसावी हा एका अज्ञात व्यक्तीशी ड्रग्स प्रकरणाशी संबंधित संशयास्पद संवाद साधत असल्याचं ऐकायला मिळत आहे.
के. पी. गोसावी : जस्ट कलेक्ट द डेटा अलोंग विथ कॉन्टॅक्ट डिटेल्स, इसके बाद में अपन मोबाईल से ही ट्रेस करलेंगे! कोई दिक्कत नही हैं. बट डोन्ट डिस्कस अपार्ट फ्रॉम मी बिकॉज आय एम डायरेक्टली टू द ऑफिशियल.
Voice of K P Gosavi talking to an unnamed informer
Voice 1 pic.twitter.com/X7Czq1L2Xf— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
के. पी. गोसावी : कबीर का…. कबीर के पास कन्फर्म होगा क्या! मुझे कन्फर्म जिनके पास होगा 10 मे से 5 तोभी कन्फर्म चाहिए हा, उनके पास निकलना चाहिए.
Voice of K P Gosavi talking to an unnamed informer
Voice 2 pic.twitter.com/kmYLjlCYS9— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
के. पी. गोसावी : दादा! दिल्ली का मेसेज डालना है तो अभी डाल दो हां.. बाद मे दिल्ली बंद हो जायेगा फार कल तक चला जायेगा.
Voice of K P Gosavi talking to an unnamed informer
Voice 3 pic.twitter.com/qCv37k4Qcr— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
के. पी. गोसावी : भाई जाने दे अभी सब लोक थक गये हैं! पुरा स्टाफ थक गया हैं और मै भी कल से सोया नाही हूं! मेरी भी हालत खराब हैं. एव्हरीबडी इज टायर्ड…
Voice of K P Gosavi talking to an unnamed informer
Voice 4 pic.twitter.com/JtV0zTF01K— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 16, 2021
मला एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं. त्यानुसार व्हाईट दुबई नावाचा व्यक्ती आहे. त्याची माहिती या चॅटमधून दिली जात आहे. केपी गोसावी फोटो पाठवायला सांगतात. त्यानंतर काशिफ खानचा फोटो पाठवला जातो. ज्या प्रमाणे फोटोच्या आधारे लोकांना ओळख करून ताब्यात घेतलं गेलं. त्याच पद्धतीने काशिफ खानला अटक का करण्यात आली नाही? त्याला सेफ पॅसेज का दिला? तो क्रुझवर दोन दिवस काय करत होता? असा सवालही मलिक यांनी केला आहे.
इतर बातम्या :
आघाडी सरकारविरोधात एल्गार पुकारावाच लागेल, रस्त्यावर उतरावेच लागेल; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
Audio clip of KP Gosavi and an unknown person released by Nawab Malik on Twitter