Aryan Khan drugs case | …ही तर फक्त सुरुवात, नवाब मलिकांचं सूचक ट्विट

| Updated on: Nov 05, 2021 | 8:07 PM

आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकूण 26 प्रकरणे तपासण्याची गरज आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू, असंही नवाब मलिक म्हणालेत.

Aryan Khan drugs case | ...ही तर फक्त सुरुवात, नवाब मलिकांचं सूचक ट्विट
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सातत्यानं एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर आरोप आणि चिखलफेक करत होते. आता समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणातून हटवण्यात आल्यानंतर नवाब मलिकांनीही सूचक ट्विट केलंय. त्या ट्विटमधून त्यांनी अनेकांवर निशाणा साधलाय.

अजून बरेच काही करावे लागेल आणि ते  आम्ही करू

आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकूण 26 प्रकरणे तपासण्याची गरज आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे. ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू, असंही नवाब मलिक म्हणालेत.

आर्यन खान केससह सहा केसेस वानखेडे यांच्याकडून काढल्या

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान केसचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आलाय. आर्यन खान केससह सहा केसेस वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आल्यात. या सर्व केसेसचा तपास एनसीबीची दल्ली टीम करणार आहे. तशी माहिती एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी मुथा अशोक जैन (Mutha Ashok Jain) यांनी दिलीय. अनेक आरोप झाल्यानंतर समीर वानखेडे यांची एनसीबीने खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी एसआयटीची स्थापनाही केली आहे. तसेच वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राचा अहवाल अजून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिलेला नाही. मात्र, या सर्व गोष्टी अर्धवट असतानाच समीर वानखेडें यांच्याकडून एकूण सहा केसेसचा तपास काढून घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

इतर बातम्या :

राज्यात सत्ता कशी मिळवायची? अर्जुन खोतकरांनी सांगितलं सोप्पं गणित; आघाडी फॉर्म्युला स्वीकारणार?

बंदी असताना गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातच भिर्रर्रर्र…बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर कारवाई होणार ?