मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची सरबत्ती करणारे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बॉम्ब फोडला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचा फोटो मलिक यांनी ट्वीट केला आहे. या फोटोत मिसेस फडणवीस यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती ही ड्रग पेडलर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
‘या’ ड्रग्ज पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय?’ असा सवाल राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांच्या ट्वीटचा हवाला देत नवाब मलिक यांनी विचारला आहे. राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ सुरु असून त्या निमित्ताने राजकीय धुरळाही उडाला आहे. त्यातच निशांत वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन अमृता फडणवीस यांचा एक फोटो शेअर करुन भाजपचं ड्रग्ज नेक्सस असा उल्लेख केला आहे. याच फोटोचा आधार घेत मलिक यांनी ‘चला आज भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या नात्यावर चर्चा करुया’ असं ट्वीट केलं आहे.
चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है pic.twitter.com/FVjbOQ8jvf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत दिसणारी व्यक्ती ‘जयदीप राणा’ (Jaideep Rana) ही ड्रग पेडलर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. विशेष म्हणजे ट्वीट करताना नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला असला, तरी त्यांचं नाव घेत त्यांनी कुठलीही थेट टीका करणं टाळलं आहे. मात्र पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Jaideep Rana https://t.co/3GccIpONI2
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
निशांत वर्मा यांचे ट्वीट काय
BREAKING- BJP’S DRUG NEXUS
This Man is “Jaydeep Chandulal Rana” (a #DRUGS peddler). Arrested by #NCB in June 2021 and currently in Jail).
What is the BJP connection @nawabmalikncp @PawarSpeaks @MumbaiPolice @CMOMaharashtra @OfficeofUT @rautsanjay61 @DGPMaharashtra pic.twitter.com/5EsMOmy2ya— Nishant Varma (@WarNishant) October 31, 2021
संबंधित बातम्या :
नवाब मलिकांचे सर्व आरोप खोटे, क्रांती रेडकर यांचा पुन्हा एकदा दावा
समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच, बोगस दाखल्यावरून नोकरी मिळवली; नवाब मलिक ठाम