गुड गोईंग… मुख्यमंत्र्यांकडून मलिकांचं कौतुक; तर वरिष्ठांनी मलिकांना थांबवावं, संजय राऊतांचं आवाहन

| Updated on: Nov 10, 2021 | 6:26 PM

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मलिक यांनी गंभीर आरोप केलेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं कौतुक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मलिकांनी आता थांबलं पाहिजे, असं आवाहन केलं आहे.

गुड गोईंग... मुख्यमंत्र्यांकडून मलिकांचं कौतुक; तर वरिष्ठांनी मलिकांना थांबवावं, संजय राऊतांचं आवाहन
उद्धव ठाकरे, नवाब मलिक, संजय राऊत
Follow us on

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह भाजप नेत्यांवर आरोपांची मालिकाच लावली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मलिक यांनी गंभीर आरोप केलेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं कौतुक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मलिकांनी आता थांबलं पाहिजे, असं आवाहन केलं आहे. (CM Uddhav Thackeray praises Nawab Malik, while Sanjay Raut’s appeals to Malik to stop allegations )

गेल्या काही दिवसांपासून मलिकांनी भाजपविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. आता तर मलिकांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरु केलीय. फडणवीस यांच्या आशीर्वादानेच राज्यात ड्रग्सचा बाजार सुरु झाल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी फडणवीसांवर मुन्ना यादव, रियाझ भाटी यांच्यावरुन फडणविसांवर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं गुड गोईंग अशा शब्दात कौतुक केल्याची माहिती मिळत आहे.

संजय राऊतांचं मलिकांना आवाहन

दुसरीकडे मलिक यांनी आता थांबलं पाहिजे असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते आज दिल्लीत बोलत होते. कधी कुणाबरोबर फोटो असेल तर तो पुरावा होऊ शकत नाही. 20 वर्षापूर्वीची व्यक्ती आज वेगळी असते. गुंड पुंड भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये स्वच्छ होतो. निवडणुकीच्या राजकारणासाठी राजकारण कोणत्या थराला गेलेय? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणी तरी कर्त्या नेत्याने हस्तक्षेप केला पाहिजे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. खूप प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत. नवाब मलिक यांचे हल्ले जोरदार आहेत. एका चिडीतून ते करत आहेत. मी राज्यपालांना भेटलो. त्यांच्याशी यावरही चर्चा केली पाहिजे. समेट घडवला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस इतरांवर अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप करत आहेत. मात्र,अंडरवर्ल्डचे लोक, ज्यांचे संबंध आहेत, गुन्हेगार आहेत. तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्या लोकांना सरकारी कमिशन आणि बोर्डांचं अध्यक्ष का बनवलं?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. मुन्ना यादव नावाचा व्यक्ती नागपूरचा गुंड आहे. तो आपला राजकीय दबाव करणारा साथीदार आहे. त्याला आपण कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष बनवलं होतं की नाही. मुन्ना यादव तुमच्या गंगेत पवित्र झाला होता की नव्हता?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

हैदर आझम नावाच्या आपल्या नेत्याला मौलना आझाद वित्तीय महामंडळाचा अध्यक्ष केलं होतं की नव्हतं? हैदर आझम बांगलादेशी नागरिकांना मुंबईत आणण्याचा प्रयत्न करतो की नाही. हैदर आझमची दुसरी पत्नी बांग्लादेशी आहे. ज्याची चौकशी बंगाल पोलिसांनी सुरु केली. बंगाल पोलिसांनी जन्मदाखले आणि इतर कागदपत्रे खोटी असल्याची माहिती होती. मालाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु असताना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात तुमच्या आदेशानं वसुली सुरु होती. मुंबईत आणि बिल्डरांकडून वसुली केली जात होती की नव्हती? तुमच्या काळात विदेशातून लोकांना फोन येत नव्हते का?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

इतर बातम्या : 

नितेश राणेंकडून रियाझ भाटीचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसोबतचे फोटो प्रसिद्ध, नवाब मलिकांना सवाल

नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बनंतर देवेंद्र फडणवीसांचं लगेचच ट्विट; म्हणाले, डुकराशी कुस्ती…

CM Uddhav Thackeray praises Nawab Malik, while Sanjay Raut’s appeals to Malik to stop allegations