बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार आणि विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांच्या फेसबुकवरील एका फोटोने सध्या राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्या फोटोवरुन आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात जयदत्त क्षीरसागर यांनी काहीसा संभ्रमात टाकणारा फोटो फेसबुकवर पोस्ट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी 3 एप्रिल रोजी रात्री उशिरा फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला. ज्या फोटोत वज्रमूठ दिसत असून, त्या बाजूला ‘लढा’ असे लिहिले आहे. कुठल्याही कॅप्शनविना पोस्ट केलेल्या या फोटोची सध्या बीडसह महाराष्ट्राच्या राजकारणत चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर हे भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांचं बीडमधील राजकारण कायमच संभ्रमाचं राहिलं आहे. त्यात जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातही वाद सुरु असल्याची चर्चा आहे.
बीडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यातील मतदभेद समोर आले होते. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जयदत्त क्षीरसागर यांचा नैसर्गिक पाठिंबा अपेक्षित असताना, त्यांनी अपक्ष उमेदवार उभा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीची जबाबदारी संदीप क्षीरसागर यांच्याकडे सोपवली होती.
बीड विधानसभा मतदारसंघासह आजूबाजूच्या परिसरात जयदत्त क्षीरसागर यांची ताकद आहे. त्यामुळे बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकीय भूमिकांनाही प्रचंड महत्त्व आहे. याच दरम्यान जयदत्त क्षीरसागर यांनी फेसबुवर संभ्रमात टाकणारा फोटो पोस्ट करुन, काही राजकीय संकेत दर देऊ पाहत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?