“राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार आमदारांना घेऊन सिद्धीविनायकाच्या दर्शनाला निघाले आहेत. यावेळी अजित पवारांनी मीडियाशी संवाद साधला. 14 तारखेली पहिली रॅली बारामतीमधून सुरु करणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय निर्णय घेतले? कुठल्या योजना दिल्या? त्या लोकांपर्यंत पोहोचवणार. उद्याच्या काळात पुढे वाटचाल करताना विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार. याची सुरुवात दर्शनाने करणार. कुणी पांडुरंगाचा दर्शन घेतं, आम्ही मुंबईत आहोत म्हणून सिद्धविनायकाच दर्शन घेतलं” असं अजित पवार म्हणाले.
‘उद्याच्या काळात प्रचाराची सुरुवात करताना पक्ष मजबूत करणार. दौरे काढणार’ असं अजित पवार म्हणाले. हॉटेल पॉलिटिक्स करणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, ‘जे योग्य वाटेल ते करु’. ‘प्रत्येक पक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो’ असं अजित पवार म्हणाले. महायुतीचे सगळे उमेदवार निवडून येणार का? यावर अजित पवार यांनी ‘प्रयत्न सुरु आहेत’, असं उत्तर दिलं.
लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले अजित पवार?
“सरकार चालवताना गोरगरिबांचा विचार करायचा असतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा सुद्धा विचार करायचा असतो” असं अजित पवार म्हणाले. “गोरगरीब महिला, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे, अशांना आपण दीड हजार रुपये महिना देणार आहोत. ज्यांना आई-वडील गरीब असल्यामुळे शिक्षण घेता येत नाही त्यांच्याही करिता 50% सवलत होती ती 100% केली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जातील” असं अजित पवार म्हणालेत.