Ajit Pawar : अजित पवारांना विजयाचा विश्वास नाही का? त्यांचं हे विधान ऐका, VIDEO

| Updated on: May 28, 2024 | 9:01 AM

Ajit Pawar : विरोधी इंडिया आघाडी यावेळी भाजपाला बहुमत मिळणार नाही, आम्ही सरकार स्थापन करु असा दावा करत आहे. दुसऱ्याबाजूला भाजपाचे नेते प्रचारसभेत आत्ताच आम्ही बहुमताचा आकडा ओलांडलाय असा दावा करत आहेत, त्यामुळे जनतेचा कौल नेमका कोणाला? या प्रश्नाच उत्तर 4 जूनलाच मिळणार आहे.

Ajit Pawar : अजित पवारांना विजयाचा विश्वास नाही का? त्यांचं हे विधान ऐका, VIDEO
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

आता लोकसभा निवडणुकीचा फक्त एक टप्पा बाकी आहे. 1 जूनला मतदान होईल. त्यानंतर एक्झिट पोल आणि 4 जूनला मतमोजणी याची सर्वांनाच उत्सुक्ता आहे. भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी असा दोघांमध्ये थेट सामना आहे. भाजपाने या निवडणुकीत 400 पारचा नारा दिला आहे. त्याचवेळी विरोधी इंडिया आघाडी यावेळी भाजपाला बहुमत मिळणार नाही, आम्ही सरकार स्थापन करु असा दावा करत आहे. दुसऱ्याबाजूला भाजपाचे नेते प्रचारसभेत आत्ताच आम्ही बहुमताचा आकडा ओलांडलाय असा दावा करत आहेत, त्यामुळे जनतेचा कौल नेमका कोणाला? या प्रश्नाच उत्तर 4 जूनलाच मिळणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांविरोधात कुठलाही ठोस भक्कम मुद्दा नाहीय. त्याचवेळी मोदी लाटही दिसत नाही पण मोदी विरोधी लाट सुद्धा दिसत नाही. त्यामुळे यावेळच्या लोकसभा निवडणुकीचे अंदाज बांधण अनेक निवडणूक तज्ज्ञांसाठी सुद्धा कठीण बनलय.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीने भरघोस यश मिळवलं. पण 2019 विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत सामील झाले आणि सगळ गणित बिघडलं. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. शिंदे आणि अजित पवार गट भाजपासोबत आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे, शरद पवार महाविकास आघाडीत आहेत. महाराष्ट्रात यावेळी काय होणार? याचा अंदाज बांधण कठीण आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती दिसून आल्याने मविआच्या जागा वाढणार असा काही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. पण मतदारांनी विकासाच्या आधारावर की, सहानुभूतीच्या आधारे मतदान केलं, ते 4 जूनला निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल.

पक्षाच्या मेळाव्यात बोलताना विधान

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पक्षाच्या मेळाव्यात बोलताना एक विधान केलं. त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “या निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्यांक समाज यंदा ठाकरे गटासोबत गेला” असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

‘शिवसेनेला ठोका असं सांगितलं जायच’

“ज्यावेळेस एकत्र काम करायचो. त्यावेळी कधी कधी सांगितल जायच, शिवसेनेवर टोकाची भूमिका घ्या, शिवसेनेला ठोका. शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्यांकाना समाधान मिळतं. शिवसेनेला ते विरोध करतात, यावेळी अल्पसंख्यांक शिवसेनेसोबत जायला निघाला होता. काय कुठं गणित कसं बदलल, यावेळेस काय होणार हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही” असं अजित पवार म्हणालेत.