“महायुतीमध्ये अजून चर्चा सुरू आहेत. बऱ्याच गोष्टींवर एकमत झाले आहे. कुठे राग, रुसवे फुगवे आहेत ते तपासात आहोत. नाशिकची जागा आम्हाला पाहिजे म्हणून काही लोक गेले. काय परिस्थिती आहे म्हणून राष्ट्रवादी गोषवारा घेत आहे. एकत्र बसून तिघे ठरवतील. जो उमेदवार ठरेल तिन्ही पक्ष मजबुतीने त्याच्या पाठी उभे राहतील. मी कुणासाठी आग्रही नाही. आम्हाला शिंदे गटा एवढ्या जागा द्याव्या एवढीच मागणी केली” असं छगन भुजबळ म्हणाले. “साताऱ्याच्या बाबत चर्चा आहे. काही वेळेला उमेदवार चांगला नसतो कधी पक्ष पाहिजे असतो. महायुतीचे जास्त खासदार निवडून आणण्याचा उद्देश आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री यांना आम्ही जे सांगायचे ते सांगितले. नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यात सिडको संस्था येते. आमच्या शाळेचा प्लॉट आहे, त्या कामासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यात कुठलेही राजकारण नाही” असं छगन भुजबळ म्हणाले.
“शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही. मी पण शिवसैनिक म्हणून आलोय. नाराज होण्याचे कारण नाही. त्यांच्याकडे जावे लागते, काही मिनिटांत बाहेर आलो, राजकारणावर चार चार तास चर्चा चालते. जर तरच्या प्रश्नाला राजकणारात उत्तर नसतं. दोन पक्षात भांडण आहे, असे नाही. जागा मिळावी यासाठी प्रयत्न करावे लागतात. तिन्ही बाजूने प्रयत्न सुरु आहेत. नाशिकची जागा आधी आमच्याकडे आली पाहिजे. मग उमेदवारांची चर्चा होईल असं छगन भुजबळ म्हणाले.
नाशिकमध्ये मनसेमुळे पेच का?
मनसे महायुतीमध्ये आल्यामुळे नाशिकच्या जागेचा कुठेही पेच प्रसंग निर्माण झालेला नाही. उलट आमची शक्ती वाढणार आहे. ते अडचण निर्माण करण्यासाठी आलेले नाहीत. राज ठाकरे यांची वरच्या पातळीवर चर्चा सुरु आहे असं छगन भुजबळ म्हणाले. महादेव जानकर हे महायुतीमधून लढणार आहेत. माझी चर्चा झाली आहे. ते कुठल्या जागेवरुन लढणार त्याची चर्चा सुरु आहे असं छगन भुजबळ म्हणाले.