मुंबई: पेगासस हेरगिरी प्रकरणापासून ते कृषी कायद्यापर्यंतच्या मुद्द्यावर केंद्र सरकार संसदेत चर्चा घडवून आणत नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाटील यांनी थेट कवितेतूनच केंद्रावर निशाणा साधला आहे. वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग उनसे डरना बंद कर देंगे, असं म्हणत जयंत पाटील यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. (ncp leader jayant patil slams bjp through poem)
जयंत पाटील यांनी प्रसिद्ध कवी गोरख पाण्डेय यांची उनका डर ही कविता ट्विट करून हा हल्लाबोल केला आहे. किस चीज़ से डरते हैं वे, तमाम धन-दौलत, गोला-बारूद पुलिस-फ़ौज के बावजूद?, वे डरते हैं कि एक दिन निहत्थे और ग़रीब लोग, उनसे डरना बंद कर देंगे! कवितेच्या या वेळी ट्विट करून पाटील यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करतानाच केंद्राला सवालही केले आहेत. स्वातंत्र्य दिन अवघ्या दोन दिवसावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी या कवितेच्या माध्यमातून देशाची परिस्थिती, जनतेची मानसिकता आणि सरकारच्या हुकूमशाहीवरच ताशेरे ओढले आहेत. पाटील यांनी अचूक टायमिंग साधत ही कविता शेअर केल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. नेतृत्व हे पुरोगामी विचाराचे व समाजात तेढ आणि कटुता न ठेवता करणारे हवे. त्यासाठी देशात मोठा सोशल चेंज व्हायला हवा. जनतेला मोकळा श्वास घेण्यास संधी मिळायला हवी मात्र आज देशात दडपशाही सुरु आहे, असे स्पष्ट व परखड मत खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 60 वर्षांमध्ये कोणतीही अस्वस्थता दिसली नाही. मात्र मागील पाच-सात वर्षात ही अस्वस्थता पहायला मिळत आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
15 ऑगस्टला भारत 75 वर्षाचा होतोय. यामध्ये प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे सातत्याने पाहिले गेले आहे. राज्याने पाच गोष्टींमध्ये बदल केला आहे. महाराष्ट्रात उत्तम शिक्षण सुरू झाले. रयत शिक्षण, अंजुमन इस्लाम या संस्था तयार झाल्या. आईवडिलांना सुरक्षित वाटणारे शिक्षण संस्था आपण तयार केल्या. आरोग्य हा दुसरा मुद्दा असून त्यामध्ये पोलिओ, देवी, कुष्ठरोग अशा अनेक रोगांवर आपण मात केली आहे. तिसरा मुद्दयामध्ये चांगल्या संस्था बांधल्या गेल्या. ज्यातून विचारांची देवाणघेवाण झाली. हे केवळ राज्यापूरते सीमित नाही. तर देशपातळीवर याची दखल घेतली आहे. चौथा मुद्दा नरेगा ही स्किम राज्याने केंद्राला दिली. स्वच्छ भारत योजना, रोजगार हमी योजना या महाराष्ट्राने तयार केल्या आणि केंद्राला दिल्या. आपल्या राज्याचे साहित्य हे फार मोठे आहे. राज्यातील साहित्य इतर राज्यांनी घेतले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. (ncp leader jayant patil slams bjp through poem)
उनका डर
किस चीज़ से डरते हैं वे
तमाम धन-दौलत
गोला-बारूद पुलिस-फ़ौज के बावजूद ?
वे डरते हैं
कि एक दिन
निहत्थे और ग़रीब लोग
उनसे डरना
बंद कर देंगे ।#Twitter— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 12, 2021
संबंधित बातम्या:
शरद पवारांच्या नावाने फोन करणाऱ्या ‘त्या’ दोघांना पुण्यातून अटक
राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा; रामदास आठवले आक्रमक
(ncp leader jayant patil slams bjp through poem)