सोलापूर – राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjit Singh Shinde) यांची ईडीकडून चौकशी (ED Enquiry) झाली आहे. चौकशी झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राज्यातील ईडीच्या कारवाया अजूनही थांबलेल्या नाहीत. आता मुंबई-पुण्यानंतर ग्रामीण भागातही ईडीच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढणे. शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, गिरणी खरेदी यासह विविध विषयात ईडीकडून तीन वेळा चौकशी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हे संपूर्ण प्रकरण 500 कोटींच्या घरात आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. आतापर्यंत पिता पुत्राची तीनवेळा चौकशी झाली आहे. सहकार क्षेत्रात आमदार बबनराव शिंदे मोठं वजन देखील आहे.
राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे कोणत्याही क्षणी जेलमध्ये जातील. ईडीकडे सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी तक्रार केली होती. शेतकऱ्यांचा घामाचा पैसा त्यांना परत मिळवून देणार, वेळ प्रसंगी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात याविरोधात आवाज उठवणार असं माढ्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यानेच राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात ईडीकडे दिली तक्रार होती.
आम्ही सर्वजण सत्तेचा गैरवापर करावा या संस्कारात वाढलेलो लोक नाही. आज धाड सुरू त्याचं आश्चर्य वाटत नाही. आम्ही चौकशी करतो. कोल्हापूरची बातमी आली की विचारतो पाहूणे येऊन गेले का. आम्ही प्रेमाने एकमेकांची चौकशी करतो. त्याचं कारण असं आहे, की स्वातंत्र्यानंतर एजन्सी आणि त्याचा वापर राजकीय विरोधकांना संपुष्टात आणण्यासाठी कधी कुणी केला नव्हता. दहा वर्षापूर्वी ईडी हा शब्द माहीत नव्हता. आज ईडीशिवाय काही चालत नाही. आज याच्याकडे उद्या त्याच्याकडे. आता काही लोक निघाले. आम्ही तुमच्याकडे येणार आहे असं सांगत असतात. येणं थांबवायचं असेल तर काही तरी व्यवस्था करा असं सांगितलं जातं. रेड टाकल्यानंतर सेटलमेट करणं या सर्व गोष्टीसाठी प्रचंड व्यवहाराच्या अपेक्षा आहेत हे ऐकायला मिळतं. हे माहीत असून केंद्र सरकार त्यावर काही करत नाही. म्हणजे या भ्रष्टाचारात केंद्रही सहभागी आहे असं कुणी म्हटलं तर त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावला.
लोकांना सत्तेचा गैरवापर आवडत नाही. देशात लोकशाही टिकली ती आमच्यापेक्षा लोकांचं लोकशाहीवरील प्रेम आहे म्हणून. आणिबाणीच्या काळात एक निर्णय चुकला त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांना पराभूत व्हावं लागलं. पण नंतरच्या लोकांना सत्ता चालवता येत नाही, हे लक्षात आल्यावर दोन वर्षात इंदिरा गांधींना सत्ता दिली. याचा अर्थ लोक शहाणे आहेत. आज जे काही उद्योग सुरू आहेत.याला अटक कर त्याला आत टाक धमक्या दे याचा अर्थ काय समजायचा. अनिल देशमुख यांच्यावर आरोप 100 कोटी गोळा करा असं सांगितलं. गोळा करा, केला नाही, पहिला चार्जशीट १०० कोटी गोळा केला आरोप. नंतर दुरुस्त केला, 4 कोटी 70 लाख. नंतर पुन्हा दुरुस्त 1 कोटी 7 लाख झाला. म्हणजे हे शंभर टक्के खोटं आहे. तपास यंत्रणा कुणाच्या तरी सांगण्यावरून काम करत आहेत हे लोकांना समजतं. लोकांत संताप आणि नाराजी आहे हे योग्यवेळी दिसेल असंही शरद पवारांनी कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.