…तर कुंडली बाहेर काढावी लागेल, निलेश लंके यांचा नाव न घेता विखे यांना इशारा

| Updated on: Oct 16, 2022 | 2:22 PM

आमदार निलेश लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील पिता- पुत्रांवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे.

...तर कुंडली बाहेर काढावी लागेल, निलेश लंके यांचा नाव न घेता विखे यांना इशारा
Follow us on

कुणाल जायकर,टीव्ही 9 प्रतिनिधी, अहमदनगर :  आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) पिता- पुत्रांवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्हाला डिवचायचं काम करू नका, नाही तर कुंडली बाहेर काढावी लागेल असा इशारा निलेश लंके यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांना दिला आहे. तसेच निलेश लंके यांनी रेमडेसिवीरवरून देखील विखे पाटलांवर नाव न घेता आरोप केले आहेत.

नेमकं काय म्हणाले लंके?

आमदार निलेश लंके यांनी विखे पिता-पुत्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  लंके यांनी नाव न घेता ही टीका केली आहे. आम्हाला डिवचायचं काम करू नका, नाहीतर कुंडली बाहेर काढणार असा इशारा लंके यांनी नाव न घेता विखेंना दिला आहे.

Nilesh Lanke | आम्हाला डिवचायचं काम करु नका, वेळेवर कुंडली बाहेर काढणार : निलेश लंके-tv9

हे सुद्धा वाचा

रेमडेसिवीरवरून आरोप

दरम्यान निलेश लंके यांनी रेमडेसिवीरवरून देखील आरोप केले आहेत. लोक सांगतात कोरोना काळात रेमडेसिवीरचे 40-42 हजार डोस घेतले, रेमडेसिवीरसाठी लोकांना पाच- पाच तास लाईनमध्ये बसून ठेवले. असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला लोकसभा निवडणुकीवेळी पाच- पाच तास बसून ठेवू  असा टोला निलेश लंके यांनी लगावला आहे. लंके यांच्या टीकेला विखे पाटील प्रत्युत्तर देणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.