मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सौर ऊर्जा आणि इथेनॉल निर्मितीतील कामाबद्दल कौतुक केले आहे. कोरोना संकटाची जाणीव राज्यातील भाजप नेत्यांना द्यावी म्हणजे ते कोरोना संकटाचा राजकीय खेळ थांबवतील अशी, अपेक्षा व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांनी जी20 संमेलनात कोरोना ही दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगातील सर्वात मोठं आव्हान असल्याचे मतं मांडले होते. त्याचा संदर्भ देत रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. (NCP MLA Rohit Pawar appriciate Narendra Modis work)
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सौर ऊर्जा आणि इथेनॉल निर्मिती क्षेत्रामध्ये झालेल्या कामाचे कौतुक केले आहे. त्यासोबतच रोहित पवार यांनी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
“कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी जी20 संमेलनात परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला”, असं रोहित पवार म्हणाले आहेत. (NCP MLA Rohit Pawar appriciate Narendra Modis work)
गेल्या काही वर्षात पंतप्रधान @narendramodi जी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं. देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे. pic.twitter.com/LaS50UG6u1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 22, 2020
नरेंद्र मोदी यांनी जी20 संमेलनात कोरोना संकटाची जाणीव करुन दिली होती. कोरोना हे जगासमोरील दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वात मोठं संकट आहे. कोरोना सर्वात मोठं आव्हान असून मानवाच्या इतिहासातील सर्वात महत्वपूर्ण स्थिती असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले होते. रोहित पवार यांनी याचा संदर्भ देत कोरोना संकटाची जाणीव भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही करुन द्यावी, असं आवाहन केले आहे. कोरोना संकटाची जाणीव झाली तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील, असं रोहित पवार म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जी20 संमेलनात कोरोना विषाणू महामारी दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. कोरोनानंतर जगात प्रतिभा, तंत्र, पारदर्शकता आणि संरक्षणाच्या आधारावर नव्या वैश्विक निर्देशांकाची निर्मिती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोदी यांनी कोरोनानंतर जी20 देशांचे एक डिजीटल सचिवालय बनवण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला.
Had a very fruitful discussion with G20 leaders. Coordinated efforts by the largest economies of the world will surely lead to faster recovery from this pandemic. Thanked Saudi Arabia for hosting the Virtual Summit. #G20RiyadhSummit
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2020
सौदी अरेबियाचे शाह सलमान यांनी जी20 समेंलनाची सुरुवात केली. यावर्षी कोरोना विषाणू महामारीमुळे जी 20मधील राष्ट्र प्रमुखांची बैठक डिजीटल पद्धतीने होत आहे. भारताकडे 2022 मध्ये जी20 समेंलनाचे आयोजनाचे यजमानपद आहे.
प्रधानमंत्री मोदी यांनी ट्विट करुन, ‘‘जी20 च्या नेत्यांसोबत रचनात्मक चर्चा झाली. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे कोरोनाचा सक्षमपणे सामना करावा लागेल, असं मोदी म्हणाले. जी 20 च्या ऑनलाईन आयोजनाबद्दल नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे आभार मानले.
संबंधित बातम्या:
रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले; ओमनी कारला धक्का मारून खड्ड्यातून बाहेर काढलं
राजकारणात चहा विकल्याचंही भांडवल केलं जातं; रोहित पवारांचा खोचक टोला
(NCP MLA Rohit Pawar appriciate Narendra Modis work)