मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची गुरुवारी भेट घेतली. राऊतांची भेट घेतल्यानंतर त्यांनी खास ट्विटही केलं. ‘संजय राऊत यांची भेट नेहमीच पर्वणी असते. त्यांच्या मार्गदर्शनाच्या नक्कीच लाभ होईल’, असं अमोल कोल्हे म्हणाले.
सध्या राजधानी नवी दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. नेते मंडळींच्या गाठीभेटींचा कार्यक्रम जोरात सुरु आहे. अशातच खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊतांची भेट घेतली. शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर कोल्हेंनी पहिल्यांदाच राऊत यांची वैयक्तिक भेट घेतली.
“शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब यांची भेट झाली. त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते. महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात ‘महाविकास आघाडी’ म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल”, असं ट्विट कोल्हेंनी भेटीनंतर केलं.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब यांची भेट झाली.त्यांची भेट ही नेहमीच पर्वणी असते.महाविकास आघाडी, मतदारसंघातील प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा करता आली. मतदारसंघात ‘महाविकास आघाडी’ म्हणून काम करताना राऊत साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होइल. @rautsanjay61 pic.twitter.com/hZvziKUHhx
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 5, 2021
अमोल कोल्हे यांनी राजकारणाचा श्रीगणेशा शिवसेनेतून केला होता. खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकारणाला सेनेमधूनच सुरुवात झाली. त्यांचं आक्रमक रुप, भाषण करण्याची स्टाईल, ते सारारत अससेली शिवाजी महाराजांची भूमिका, अफाट लोकप्रियता, यांच्या बळावर त्यांना राजकारणात फार थोड्या वेळात मोठी प्रसिद्धी मिळाली. पण शिवसेनेत त्यांना निव़णूक लढविण्याची संधी मिळाली नाही.
2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी खासदार कोल्हे यांनी शिवसेनेला धक्का देत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधून शिरुर लोकसभेचं राष्ट्रवादीचं तिकीट मिळवलं. शिवसेनेचे दिग्गज उमेदवार आणि विजयी चौकार मारण्यासाठी आसुसलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना आश्चर्यकारररित्या कोल्हेंनी पराभवाचं तोंड पाहायला लावलं.
नंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली. राज्यात महालिकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. साहजिक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जवळीकता वाढत गेली… आताही वाढते आहे… नेते मंडळींमध्ये गाठीभेटी होतायत… चर्चा होतायत…
(NCP MP Amol Kolhe meet Shivsena MP Sanjay Raut)
हे ही वाचा :
घटनात्मक पेचप्रसंग राजभवनातच, त्यांचे बोलविते धनी कोण?; संजय राऊत यांचा सवाल