‘अहो चिऊताई, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?’ राष्ट्रवादीची मुंबईत बॅनरबाजी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना ‘शकुनीमामा’ म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर लावून, “देश की जनता जानना चाहती है, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?” अशी विचारणा केली आहे. राष्ट्रवादीने पोस्टरमधून काय प्रश्न विचारला आहे? “अहो, चिऊताई, महाभारत, रामायण […]

अहो चिऊताई, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा? राष्ट्रवादीची मुंबईत बॅनरबाजी
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना ‘शकुनीमामा’ म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर लावून, “देश की जनता जानना चाहती है, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?” अशी विचारणा केली आहे.

राष्ट्रवादीने पोस्टरमधून काय प्रश्न विचारला आहे?

“अहो, चिऊताई, महाभारत, रामायण यांचे कथानक राहू द्या… देश की जनता यह जानना चाहती हैं, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?” असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने विचारला आहे.

 

पूनम महाजन काय म्हणाल्या होत्या?

“तुम्ही दाखवत असाल की, सगळ्यांचे ऐकत आहात. मात्र, शकुनी मामा सारखं सगळ्या ठिकाणी नाक लावून लावून महाभारत सुरु केलं, असे आपण शरद पवार आहात. अशी महागठबंधनची गोष्ट आहे. बघितलं ना, शकुनी मामा कसा असतो? स्वत:ला मिळालं नाही ना, तर इकडचं तिकडे आणि तकडचं इकडे. मंथरा असो शकुनी मामा असो, हे महागठबंधनचे चेहरे आहेत.” असे खासदार पूनम महाजन म्हणाल्या होत्या.

जितेंद्र आव्हाडांचंही पूनम महाजनांवर टीकास्त्र

“प्रवीण महाजनने प्रमोद महाजनांना गोळ्या का मारल्या? याचे अंतर्गत जे काही कांगोरे आहेत, ते काही जणांना माहित आहेत. त्यापैकी मी एक आहे. आमच्या बापाला बोलाल, तर खबरदार. मर्यादा सोडायला दोन मिनिटंही लागणार नाहीत. पण दोघांचेही (शरद पवार आणि प्रमोद महाजन) संबंध होते, त्याची तरी आपल्याला आठवण यायला हवी होती.” असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पूनम महाजनांवर टीका केली.

VIDEO : पूनम महाजन काय म्हणाल्या होत्या?