मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपच्या ओबीसी आरक्षणासाठीच्या (BJP OBC Reservation Protest) चक्काजाम आंदोलनावर टीका केली आहे. राज्य भरातील ओबीसी नेतृत्त्व ठरवून मोडीत काढणारा भाजप आज ओबीसी आरक्षणसाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, अशा शब्दात जयंत पाटील यांनी महाराष्ट्र भाजपवर टीका केली आहे. (NCP State President Jayant Patil slams BJP over OBC Reservation Protest for political reservation)
राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.
सौ चुहे खाके बिल्ली हज को चली. #OBCreservation
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 26, 2021
जयंत पाटील यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांवर टीका करताना “राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली”, असा टोला लगावला आहे. जयंत पाटील यांनी यानिमित्तानं विधानसभा निवडणुकीत भाजपनं ओबीसी नेत्यांना नाकरण्यात आलेल्या तिकिटांच्या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाजपनं तिकीट कापलं होतं, त्याकडे लक्ष वेधलं आहे. जयंत पाटील यांच्या या ट्विटचा रोख माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं दिसतं.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ते आंदोलन करताना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना, असा सवाल रोहिणी खडसे यांनी भाजपला विचारला आहे. रोहिणी खडसे यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे.
ते आंदोलन करतांना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना..@BJP4Maharashtra@NCPspeaks
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 26, 2021
आजचे भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद आहे. फक्त राजकारण करण्यासाठी हे आंदोलन आहे. आरक्षण ओबीसी समाजाला मिळायलाच हवं यात कोणाचेही दुमत नाही, फक्त यात राजकारण करू नका, असंही रोहिणी खडसे म्हणाल्या.
संबंधित बातम्या:
तर ओबीसींचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं, छगन भुजबळ यांची खुली ऑफर
(NCP State President Jayant Patil slams BJP over OBC Reservation Protest for political reservation)