असं पहिल्यांदाच घडलं, बाप खासदार असलेला पक्ष मुलाने सोडला, तरीही मुलाच्या पक्षांतर सोहळ्याला बाप हजर

| Updated on: Oct 23, 2024 | 10:36 PM

भाजप नेते निलेश राणे यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजप खासदार नारायण राणे देखील उपस्थित होते. निलेश राणे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन निवडणूक लढवणार आहेत.

1 / 5
भाजप खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाला. विशेष म्हणजे बाप खासदार असलेला पक्ष मुलाने सोडला तरीही मुलाच्या पक्षांतर सोहळ्याला बाप हजर राहण्याची घटना आज बघायला मिळाली. निलेश राणे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात स्वत: नारायण राणे उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी भावनिक भाषण केलं. "मुख्यमंत्री 15 ते 20 मिनिटात इथे पोचतात. आज माझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. जेव्हापासून आयुष्य कळायला लागलं तेव्हापासून राणे साहेबांच्या (वडील नारायण राणे) सावली बाहेर जाण्याचा प्रयत्न केला नाही. पुढेही करणार नाही", असं निलेश राणे म्हणाले.

2 / 5
"मागच्या दहा वर्षात अनेक संध्या आल्या. विधानसभेची, लोकसभेची ऑफर आली. पण मी सांगून टाकलं जिथे राणे साहेबांचा पराभव झाला तीच जागा मला लढवायची आहे. जे २०१४ ला गेलं ते २०२४ ला परत आणणार. मरेपर्यंत याच मातीत काम करणार. लोकांनी फक्त माझी एक बाजू बघितली पण मी कधी कोणाला सांगायला गेलो नाही", असं निलेश राणे म्हणाले.

3 / 5
"निलेश राणे असा नाहीय. या दहा वर्षात अनेक गोष्टी माझ्या हातातून निघून गेल्या. अनेक सहकारी निघून गेले. माझ्या आडनावात राणे आहे. महाराष्ट्रात जिथे जातो तिथे मला बघायला उभे राहतात अजून काय पाहिजे. पदांची गरज नाही", असं निलेश राणे यावेळी म्हणाले.

4 / 5
"केसरकरांनी आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. नितेशने आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा आणली आणि इथल्या मतदारसंघात काय? या मतदारसंघाची जी ओळख गेली आहे ती परत आणण्यासाठी ही धडपड आहे", असं निलेश राणे यांनी सांगितलं.

5 / 5
"शिवरायांची शपथ घेऊन सांगतो. मी कधीच या मतदारसंघात ठेकेदारी करणार नाही. ठेकेदाराला फोन करणार नाही. बदनामी पोटी माझे आणि राणे साहेबांचे दोन पराभव झाले. आजची सभा फेल झाली पाहिजे म्हणून इथले आमदार सकाळपासून कामाला लागले. अहो ही सभा राणे साहेबांची आहे. एकनाथ शिंदेंची आहे. ती कधीच फेल जाऊ शकत नाही. पुढे सरकार महायुतीचे येणार आणि उदय सामंत नक्की मंत्री होणार. तिकडे नितेश राणे निवडून येणार, इकडे दीपक केसरकर निवडून येणार आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद असले तर निलेश राणे देखील निवडून येणार", असं निलेश राणे म्हणाले.