आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

| Updated on: Nov 10, 2021 | 2:20 PM

नवाब मलिक आणि त्यांचा मुलगा फराज मलिक यांनी हा व्यवहार मान्य केला असला तरी त्यातील अंडरवर्ल्डशी कनेक्शनचा आरोप फेटाळून आला आहे. दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचा धागा पकडत भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
नितेश राणे, उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत नवाब मलिक यांनी जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. नवाब मलिक आणि त्यांचा मुलगा फराज मलिक यांनी हा व्यवहार मान्य केला असला तरी त्यातील अंडरवर्ल्डशी कनेक्शनचा आरोप फेटाळून आला आहे. दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचा धागा पकडत भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. नितेश राणे यांनी ट्वीट करुन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. (BJP MLA Nitesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray)

’93च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं. आता त्यांचाच मुलगा 93 दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्यांबरोबर मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगतोय. खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो…’ असं ट्वीट करुन नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय.

मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

नवाब मलिक यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आज सकाळी 10 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करताना पाच ते सहा वेळा मुन्ना यादवचं नाव घेतलं. मुन्ना यादवचं नाव घेऊन त्यांनी फडणवीसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला.

त्याचबरोबर आमचा तुम्हाला सवाल आहे की रियाझ भाटी कोण आहे. 29 ऑक्टोबरला रियाझ भाटी बनावट पासपोर्ट सोबत सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम संबंधाच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या. रियाझ भाटी सर्व कार्यक्रमात तुमच्या सोबत का दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करायचा नाही. त्यांच्या कार्यक्रमात जायचं असल्यास तपासणी केल्याशिवाय परवानगी मिळत नाही. रियाझ भाटीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढले. रियाझ भाटीसोबत तुम्ही वसुलीचं काम केलं, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. तुमच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात वसुलीचा खेळ सुरु होता. देवेंद्र फडणवीसांची काळी कामं तुमच्यासमोर ठेवणार आहे.

नितेश राणेंकडून फोटो प्रसिद्ध

नितेश राणे यांनी नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत ‘नवाबभाई कहते है ‘रीयाझ भाटी दाऊद का आदमी है’ या वाक्यासोबत रियाझ भाटीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचे जुने फोटो ट्विट केले आहेत.

इतर बातम्या :

VIDEO: शरद पवार, उद्धव ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंसोबत रियाझ भाटीचे फोटो; आशिष शेलारांच्या आरोपांनी खळबळ

सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर पगाराची जबाबदारी घेणार का? एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावं, अनिल परब यांचं आवाहन

BJP MLA Nitesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray