नवी मुंबई : भारत (India) देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महत्वाचे शहर असणा-या मुंबईच्या (Mumbai) उत्तरेला सॅटेलाईट टाऊनशीप निर्माण करण्याची सूचना 1948 मध्ये तत्कालीन महापौर मोडक समितीने केली होती. त्यांनतर फेब्रुवारी 1959 साली एस.जी.बर्वे समितीमार्फत त्यावेळेच्या मुंबई सरकारकडे सुपुर्द केलेल्या अहवालात मुंबई शहराच्या विकासाकरीता ठाणे खाडीवर रेल्वे आणि रस्ता वाहतुकीकरीता खाडीपुल (Khadipul) बांधण्याची शिफारस करण्यात आली होती. लवकरचं नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणा आहेत. त्यामुळे तिथंही आत्तापासून बैठकीच्या सत्रांना सुरुवात झाली आहे. कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याची राजधानी आणि देशाचे आर्थिक केंद्र असणा-या मुंबई महानगराच्या वाढत्या लोकसंख्येला पर्याय शोधण्याची गरज प्रकर्षाने भासू लागली. याबाबत मार्च 1965 मध्ये नागरी समस्यांवर उपाययोजना शोधण्याकरीता शासनाने नियुक्त केलेल्या प्रा.डी.आर.गाडगीळ समितीनेही बर्वे समितीच्या शिफारसींवर शिक्कामोर्तब केले. ठाणे खाडीपलिकडे नवे शहर वसविण्याचे ठरले आणि नवी मुंबई आकारास आली. याकरीता 17 मार्च 1970 रोजी शहर आणि औद्योगिक वाकास महामंडळ अर्थात सिडको प्राधिकरणाची स्थापना करण्यात येऊन ठाणे – बेलापूर पट्टीतील गांवांसह पनवेल, उरण, द्रोणागिरी अशा पट्ट्यातील 95 गावांच्या विकासप्रक्रियेला सुरूवात झाली. दि. 1 जानेवारी 1992 मध्ये महाराष्ट्र शासनाने नगरविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील 45 गावांच्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना केली.
35 (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
35 (ब) सर्वसाधारण महिला
35 (क) सर्वसाधारण
व्याप्ती – नेरूळ सेक्टर-१०, सेक्टर- १० ए (भाग), सेक्टर- १२, सेक्टर-२० गावियो, सेक्टर २२, सेक्टर- २८ (भाग), नेरूळ गाव, व इतर.
उत्तर- झुलेलाल मंदिरा लगतच्या चोका पासून पूर्वेस गणेश- शिव मंदिर समोरील रस्त्याने सारसोळे बसडेपोच्या उत्तरेकडून सहकार बाजारा समोरून पूर्वेस संत ज्ञानेश्वर चौकापर्यंत व तेथून दक्षिणेस कोंडाजी बाबा ढेरे मार्गाने पटकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या उत्तर हद्दीपर्यंत व तेथुन पुर्वेस पटकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनच्या उत्तेरकडील कुंपण भितीने (सन शाईन सोसायटी, साई कृपा सोसायटी, नंदनवन सोसायटी, इद्रप्रस्त सोसायटी च्या दक्षिणेकडील कुंपण भितीने) के धड़ आंबेकर मार्ग पर्यत व तेथुन के. धोंडू आंबेकर मार्गाने दक्षिणेस NL- १A बिल्डींग क्र. ३४.३५ व ३६ सेक्टर- १० नेरूळच्या दक्षिण बाजूने व बिल्डींग क्रमांक ३७ च्या उत्तर बाजूने रेल्वे ट्रॅक पर्यंत..
पूर्व ठाणे पनवेल रेल्वे मार्ग
दक्षिण – अनमोल हिरा सोसायटी भुखंड क्र. २५, सेक्टर-२८ व कलश सागर सोसायटी पासून पूर्वेस रस्त्याने भूखंड क्र- ७०, सेक्टर-२८ नेरूळ पर्यंत व तेथुन पूर्वेस लिटील प्लॉवर चर्चच्या दक्षिण बाजूने कुंपण भिंतीने ब्रम्हगिरी मार्गाने दक्षिण दिशेने तेरणा कॉलेजच्या कुंपण भिंतीपर्यंत, व तेथून पूर्वेस कुंपण भिंतीने ठाणे पनवेल रेल्वे मार्गा पर्यंत.
पश्चिम : झुलेलाल मंदीरापासून दक्षिणेस गोपाळ राघो पाटील चौक, शंकर चांगु कान्हा ठाकुर चौकापासून भूखंड क्र. २४ कलशसागर सोसायटी पर्यंत
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
पक्ष | विजयी | उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |