पक्षात कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही; पाच तासाच्या मॅरेथॉन बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

| Updated on: Nov 26, 2021 | 4:50 PM

पक्षांच्या नेत्यांसोबत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली आहे. मात्र, पक्षात कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही, असं महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

पक्षात कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही; पाच तासाच्या मॅरेथॉन बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
devendra fadnavis
Follow us on

नवी दिल्ली: पक्षांच्या नेत्यांसोबत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली आहे. मात्र, पक्षात कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही, असं महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमधील संघटनात्मक फेरबदलावरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. आज त्यांनी भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे नेते बीएल संतोष आणि सीटी रवी यांची भाजप मुख्यालयात भेट घेतली. या नेत्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास चर्चा झाली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.

संघटनात्मक बाबींवर चर्चा

माझ्या दिल्लीवारीनंतर कुठल्या राजकीय चर्चेला उधाण आलं याची मला कल्पना नाही. मी इथे संघटनात्मक बैठकीसाठी आलो होतो. चंद्रकांतदादा आणि मी सीटी रवी तसेच बीएल संतोष यांच्याशी चर्चा केली. संघटनेची पुढची वाटचाल आणि त्याचा आढावा यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तब्बल चार ते पाच तास ही बैठक चालली. या बैठकीत वेगळा काही अजेंडा नव्हता, असं ते म्हणाले. अमित शहा आमचे नेते आहेत. दिल्लीत आल्यावर त्यांची भेट घेतोच. त्यांच्याशीही चर्चा झाली. पक्षात कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राणे काय म्हणाले माहिती नाही

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मार्चमध्ये सरकार कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. त्याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आलं असता मला त्याची माहिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

बावनकुळेच विजयी होतील

यावेळी त्यांनी नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. काँग्रेसला अपेक्षा आहे की ते चमत्कार घडवतील. पण काहीही चमत्कार होणार नाही. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेच निवडून येतील, असा दावाही त्यांनी व्यक्त केला.

 

संबंधित बातम्या:

Vidhan Parishad Election : मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबारमध्ये साटंलोटं! नागपूर आणि अकोल्यात मात्र तगडी फाईट, वाचा सविस्तर

देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना डावललं त्यांना पुन्हा संधी; भाजपमध्ये नेमकं काय चाललंय?

राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार; नाना पटोले म्हणतात, भाजपच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही