‘आधी मराठा आता OBC समाजाची माती केली’, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

| Updated on: May 29, 2021 | 6:56 PM

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण झाल्याची टीका वाघ यांनी केलीय.

आधी मराठा आता OBC समाजाची माती केली, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
chitra wagh
Follow us on

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. त्यावरुन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आता भाजपच्या उपनेत्या चित्रा वाघ यांनीही सरकारवर टीका केलीय. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण झाल्याची टीका वाघ यांनी केली आहे. (Additional OBC reservation in local bodies canceled, BJP leader Chitra Wagh criticizes Thackeray government)

OBC आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांनी विस्तृत भाष्य केलेलं तेव्हा सरकार म्हणून आपण काय केलतं? आधी मराठा आता OBC समाजाची माती केलीत…वर तोंड करून म्हणतात आम्ही OBC साठी लढू. अरे तुमच्या नाकर्त्यापणामुळे गेलयं आरक्षण, लढायला आमचे आम्ही भक्कम, सरकार म्हणून तुम्ही काय करणार ते सांगा, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय. हे ट्वीट करताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटचा आधार घेतलाय.

‘निर्बुद्ध व्यक्तीच्या हातात कारभार दिल्याचे परिणाम’

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. ‘ठाकरे सरकारचा आणखी एक प्रताप. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द! सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. वारंवार सूचना करून देखील ठाकरे सरकारची सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात दिरंगाई. निर्बुद्ध व्यक्तीच्या हातात कारभार दिल्याचे हे परिणाम आहेत. होते ते देखील सांभाळता आलं नाही’, अशी टीका बावनकुळे यांनी केलीय.

नाकर्तेपणा सोडा आणि जागे व्हा: फडणवीस

दरम्यान, ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झाल्याने त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली आहे. तसेच याबाबत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रंही लिहिलं आहे. राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या : 

त्यावेळी संभाजी छत्रपतींनी संसदेत तोंड का उघडले नाही?; कोळसे-पाटलांचा सवाल

मोठी बातमी: स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारची याचिका फेटाळली

Additional OBC reservation in local bodies canceled, BJP leader Chitra Wagh criticizes Thackeray government