‘शरद पवारांचं ओबीसी प्रेम अचानकपणे उफाळून आलं, हेतू काय?’, आमदार गोपीचंद पडळकरांचा खोचक सवाल

| Updated on: Aug 16, 2021 | 6:17 PM

शरद पवारांच्या टीकेला आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांचं ओबीसी प्रेम आज अचानकपणे उफाळून आलं आहे. ते कुठलंही काम हेतूशिवाय करत नाहीत आणि त्यांचा खरा हेतु कधी दाखवतही नाहीत, असा टोला पडळकर यांनी पवारांना लगावला आहे.

शरद पवारांचं ओबीसी प्रेम अचानकपणे उफाळून आलं, हेतू काय?, आमदार गोपीचंद पडळकरांचा खोचक सवाल
गोपीचंद पडळकर आणि शरद पवार
Follow us on

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधला, असा हा प्रकार असून केंद्राने ओबीसींची शुद्ध फसवणूक केलीय, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. पवारांच्या या टीकेला आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांचं ओबीसी प्रेम आज अचानकपणे उफाळून आलं आहे. ते कुठलंही काम हेतूशिवाय करत नाहीत आणि त्यांचा खरा हेतु कधी दाखवतही नाहीत, असा टोला पडळकर यांनी पवारांना लगावला आहे. (Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar on OBC reservation issue)

केंद्र सरकारनं ताट वाढलं हे खरं आहे. तुमचे हात पण बांधले गेले आहेत तेही खरं आहे. पण हे हात कुणामुळे बांधले गेले? केंद्रामुळं की आपल्या पै पाहुण्यांच्या प्रेमामुळं? असा खोचक सवालही पडळकर यांनी पवारांना विचारलाय. उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाचं मोठं केलं. जेव्हा जेव्हा सत्तेचा भाग बनलात तेव्हा आपल्या करामतीने मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण घालवले. जो 2011 सालचा सेन्सेस अहवाल तुम्ही आता मागताय त्यातला घोळ तुम्ही सहभागी असलेल्या मनमोहन सिंग सरकारनेच घातला आहे. भागीदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंबा मात्र मोदी सरकारच्या नावानं ठोकायच्या, अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केलीय.

तुम्हाला जातीनिहाय जनगणनेचा डेटा कशाला हवाय?

‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरिता तुम्हाला इंपेरिकल डेटा द्यायचाय आणि मराठा आरक्षणाबाबत आपण अजून त्यांना मागासलेले सिद्ध करण्याची कोणतीही प्रक्रियाच सुरू केलेली नाही. नुसत्या भुलथापा मारायच्या आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं, ही तुमची प्रस्थापितांची करामत आज बहुजनांना कळाल्यामुळेच जे मराठा आरक्षणाबाबत बोलताना नेहमी पळ काढत होते, अशा शरदचंद्र पवारांनांचं आज भूमिका मांडावी लागतेय. हाच बहुजनांचा प्रस्थापितांविरोधतला पहिला विजय आहे’, अशी टीकाही गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलीय.

ओबीसी आरक्षणावरुन पवारांची केंद्रावर टीका

घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे आरक्षणासाठी सरकारने पाऊल टाकलं असं लोकांचा गैरसमज झाला. ही ओबीसींची शुद्ध फसवणूक आहे. 1992मध्ये 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार याबाबत आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला होता. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्यात येणार नाही, असं सांगितलं होतं. केंद्राने नंतर घटना दुरुस्ती करून 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. राज्यांना ओबीसींची यादी तयार करून आरक्षणाचा निर्णय घेऊ शकता असं केंद्राने भूमिका मांडली आणि दुरुस्ती केली. पण त्याचा काही उपयोग होणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

संबंधित बातम्या :

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, आता खुद्द शरद पवारांकडून उत्तर

ओबीसींना आरक्षण कसे मिळणार?; शरद पवारांनी सांगितल्या कायद्याच्या 3 गोष्टी!

Gopichand Padalkar criticizes Sharad Pawar on OBC reservation issue