मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून 26 जून अर्थात शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. राज्यभरात 1 लाख कार्यकर्ते स्वत:ला अटक करुन घेतील असं पाटील म्हणाले. भाजपच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर आता काँग्रेसनंही 26 जून रोजी आंदोलनाची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या आंदोलनाची घोषणा केलीय. (Congress will also agitate on June 26 on the issue of OBC reservation)
सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शनिवार 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं पटोले यांनी घोषित केलंय.
आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली होती, पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याचा दावा पटोले यांनी केलाय.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. भाजपच्या या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शनिवार 26 जून रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोविड नियमांचे पालन करून आंदोलनात सहभागी होतील असंही पटोले यांनी म्हटलंय.
Delta Plus variant : महाराष्ट्रात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू, आरोग्य मंत्री टोपेंची माहिती https://t.co/0uOMqBElAg #DeltaPlusVariant | #Maharashtra | #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2021
संबंधित बातम्या :
निवडणुका रद्द करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं निवेदन, निवडणूक आयुक्त म्हणाले, आता निवडणुका थांबणार नाहीत!
Congress will also agitate on June 26 on the issue of OBC reservation