“मराठा बांधवांवर बेरोजगाराची वेळ आली. नोकरी नाही. याला ओबीसी आरक्षण जबाबदार नाही. मराठा समाज ओबीसीमध्ये आल्याने त्यांची परीस्थिती लगेच बदलणार नाही. मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. तुम्ही ओबीसी झाले तर गरीबी हटणार हे कोणी सांगितले तुम्हाला?” असा सवाल OBC आरक्षण आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विचारला. “संविधानाला आव्हान देण्याची भाषा करणे योग्य नाही. महाराष्ट्रातील नेते पाच वर्ष निवडणूक मोड मध्ये व्यस्त असल्याने प्रश्न सुटत नाही. सामजिक व्यवस्था बिघडत आहे. आजही महाराष्ट्रातील ओबीसी सामजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे” असं लक्ष्मण हाके म्हणाले.
“म्हणून आम्ही वडीगोद्रित आंदोलन केले. उपोषणाला बसलो. जरांगे पाटील म्हणतात, आम्ही खूप काही खाल्ले. पण अर्थसंकल्पात ओबीसीला 1% पैसे देत आहेत. मग आम्हाला काय मिळालं आहे? महाराष्ट्रात एकही ओबीसी वसतिगृह नाही. सरकारने सहकरी साखर कारखान्यांना पैसे दिले. ओबीसींना अर्थसंकल्पात काय दिलं?” असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला. “याआधी इतर ठिकाणीं अनेक ओबीसी आंदोलनं झाली. मात्र शासनाने लक्ष दिलें नाहीं. म्हणून आम्ही शासनाचे आमच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वडीगोद्रीत आंदोलन केले” असं लक्ष्मण हाके म्हणाले.
‘किमान 50 पोरं आमची विधानसभेत गेली पाहिजेत’
“याआधी ओबीसी समाजाचे अनेक नेते एकत्र आले आहेत. आताच्या नेत्यांनी तसं एकत्रित यायला हवं. आमचे लोक विधानसभेत गेले तर आवडेल. किमान 50 पोरं आमची विधानसभेत गेली पाहिजेत. आमच्या समाजाच प्रतिनिधीत्व करायला आत जायला हवं. भकोचा DNA ओबीसी असेल तर पुढं या” असं लक्ष्मण हाके म्हणाले. “जी भूमिका संविधानाला धरून असेल, कायद्याला धरून असेल ती मांडा. धनगर समाजाचा एकही खासदार आज संसदेत नाही हे वाईट आहे. समाजाला प्रतिनिधीत्व द्यायला हवं. सामाजिक समतोल राहिला पाहिजे” असं लक्ष्मण हाके म्हणाले.
‘माझ्याकडे प्रचाराला पैसे देखील न्हवते’
“लोकसभेच्या वेळी मी शरद पवार साहेबांकडे गेलो होतो. त्यांनी तिकीट फायनल पण केलं होतं, पुढे काय झालं माहिती नाही. हे खरय की, मला केवळ 5 हजार मत पडली. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव देखील याच देशात झाला होता. मी तुलना करत नाही, पण उदहारण देत आहे. माझ्याकडे प्रचाराला पैसे देखील न्हवते” असं लक्ष्मण हाके म्हणाले.