मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे 18 फेब्रुवारी रोजी कोर्लई इथं जाणार आहेत. 19 बंगल्यांच्या वादग्रस्त विषयाबाबत अखेर कोर्लई गावात मी जाणार आहे, त्यांनी स्वतः किरीट सोमय्यांनी म्हटलंय. यावेळी ते 19 बंगल्याच्या (19 Bunglow) आरोपांवर आता आणखी काय नवा दावा करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 19 बंगले कुठे आहेत, ते दाखवा, असं आव्हान संजय राऊत यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press conference) दिलं होतं. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावात जाऊन पाहणी करणार असल्याचं म्हटलंय. ते बंगले कुठे चोरी झाले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. त्यावर राऊतांनीही प्रतिक्रिया देत बंगले आहेत का दाखवावेत, असा टोला लगावला होता.
18 Feb I will visit Alibag, Village Korlai & Revdanda Police Station to pursue issue of Uddhav Thackeray Family’s 19 Bungalows
Property Taxes, Electricity Tax, Health Tax paid for 1 April 2009 to 31 March 2021
Last payment on 12 Nov 2020
19 Bungalows Kanha Hai?
CHORI Ho Gaye? pic.twitter.com/E7z0TihLys
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 16, 2022
भाजप नेते किरीट सोमय्या नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं की, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचंय. मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरली. त्याचं 5.42 लाख असं ग्रामपंचायतीनं व्हॅल्युएशन दाखवलंय. 2008 मध्ये व्हिजीट करून घरं बांधून झाली. तुम्ही एग्रीमेन्ट 2014 मध्ये केलं. मुख्यमंत्र्यांनी 12 नोव्हे 2020 ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरं चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी केलाय. शिवाय मी 12 महिन्यांपूर्वीच घरं चोरीला गेल्याची तक्रार केली. मग आता घरं नाहीत, अशी नाटकं का करता. ठाकरेंच्या पत्नीनं, रवींद्र वायकरांनी, घोस्ट घरं दाखवून कोट्यवधी लाटले असा आरोपही सोमय्यांनी केला होता.
किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, 31 मार्च 2021 पर्यंत अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे, मनीषा वायकर कर भरत आहेत. याचा अर्थ जागा केव्हा घेतली रश्मी आणि मनिषा यांनी 2013 मध्ये एमओयू केलं. जेव्हा वायकर स्थायी समितीचे अध्यक्ष होते. हा ग्रामपंचायतीचा अधिकारय. जो ‘आरटीआय’मधून समोर आला. रश्मी आणि मनीषा यांच्यातर्फे 30 जाने 2019 रोजी घरपट्टी त्यांच्या नावे करण्याचा अर्ज आला आहे. आणि ग्रामपंचायत त्यांचा अर्ज मान्य करून घरं करत आहेत.
कोर्लई गावच्या संरपंचांना विचारले असता., किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचं सरपंचांनी म्हटलं आहे. तसंच ती घरं अन्वय नाईक यांनी बांधली होती, अशी Exclusive माहिती tv9 मराठीला त्यांनी दिली आहे. 19 बंगले नाही तर 18 घरं बांधली होती. त्यानंतर सीआरझेडमधली कच्ची घरं तोडली गेली. तसंच 2014ला ही जमीन मनिषा वायकरांना विकली, अशी माहिती सरपंचांनी दिली आहे.
ज्या कोर्लई गावातील 19 बंगल्यांवरुन संजय राऊत आणि किरीट सोमय्या असा वाद सुरु आहे, त्या गावच्या सरपंचांनी काय म्हटलं ऐका.. @rautsanjay61 @ShivSena @KiritSomaiya pic.twitter.com/TTBFMqtnmq
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2022