भाजपच्या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं, शिवसेनेची हाक; पवारांबाबत केलं ‘हे’ विधान

| Updated on: Jan 15, 2021 | 7:53 PM

देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, गैर भाजपाशासित राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाही. त्यामुळे भाजपच्या या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं, असं आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं. (opposition need to unite against modi says sanjay raut)

भाजपच्या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं, शिवसेनेची हाक; पवारांबाबत केलं हे विधान
Follow us on

मुंबई: देशात भाजपची तानाशाही सुरू आहे, गैर भाजपाशासित राज्यातील सरकारांना केंद्र सरकारकडून कोणतंही पाठबळ दिलं जात नाही. त्यामुळे भाजपच्या या तानाशाही विरोधात डाव्या-उजव्यांनी एकत्र यावं, असं आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबरीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. त्यामुळे देशात नेतृत्वाची वाणवा अशी नाही, असंही राऊत म्हणाले. (opposition need to unite against modi says sanjay raut)

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकार चालवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. केंद्राचं अजिबात पाठबळ मिळत नाही. विकास करायला गेला तर खो घातला जात आहे. मेट्रो हे त्याचं उदाहरण आहेच, ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही, त्या ठिकाणी हीच परिस्थीत आहे. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येऊन मोदींविरोधात मजबूत संघटन निर्माण करण्याची गरज आहे, असं राऊत म्हणाले. आता काही निवडणुका नाहीत. पण मोदींच्या विरोधात विरोधकांनी एकत्र आलंच पाहिजे. अनेक पक्ष भाजपच्या विरोधात निवडणूक लढून सत्तेत आले आहेत किंवा विरोधी पक्षात आहेत. हे पक्ष यूपीएचा भाग नाहीत. त्या सर्वांनी यूपीएत आलं पाहिजे, असं ते म्हणाले.

यूपीएची ताकद वाढणे गरजेचं

आज सोनिया गांधी या यूपीएच्या चेअरमन आहेत. एवढ्या वर्षांपासून त्या आघाडीचं नेतृत्व करत आहेत. मात्र यूपीएची ताकद वाढणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त पक्षांनी यूपीएत येऊन मोदींच्या तानाशाहीला रोखण्याची गरज आहे, असं सांगतानाच विरोधी पक्ष कमजोर होणे म्हणजे लोकशाही खतम होणे असं आहे, असंही ते म्हणाले.

पवारांचाही विचार होऊ शकतो

यूपीएचं नेतृत्व कोण करू शकतं? असा सवाल राऊत यांना विचारला असता त्यावर त्यांनी थेट भाष्य केलं. या देशात नेत्यांची कमी नाही. झाडाला एक दगड मारले तर राष्ट्रीय स्तरावरचे 17 नेते पडतील. एकेकाळी सर्वजण सोनिया गांधींच्या नेतृत्वात एकत्र आले होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातही आले होते. देशात सोनिया गांधींच्याबरोबरीने शरद पवार हे सर्व मान्यता असलेले नेते आहेत. पवारही मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

एनडीए म्हणजे माचिसचा रिकामा डबा

यावेळी त्यांनी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएवरही टीका केली. एनडीएत आता कोणी नाही. आम्हीही नाही. अकाली दलही बाहेर पडला आहे. बिहारमधील वातावरण पाहता उद्या नितीशकुमारही बाहेर पडतील, असं सांगतानाच एनडीए म्हणजे माचिसचा रिकामा डबा आहे, अशी टीका त्यांनी केली. एनडीएत कोण आहे, याचं संशोधन करावं लागेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

म्हणून ईडीच्या नोटीसा

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेच्या लोकांनाही ईडीच्या नोटीसा आल्या आहेत. जे विरोधात आहेत आणि ज्यांच्याशी राजकीय सामना केला जात नाही, अशा लोकांनाच नोटीसा पाठवल्या जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचा वापर करून नमवण्याचा प्रयत्न कराल तर तसं होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (opposition need to unite against modi says sanjay raut)

 

संबंधित बातम्या:

राहुल गांधींची मेहनत वाखणण्याजोगी पण कुठेतरी ते कमी पडतायत, राऊतांचा धडाकेबाज अग्रलेख

पालिकेतील समावेशाच्या प्रक्रियेनंतरही निवडणूक; पुण्यातील ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

LIVE | नवीन वर्षात पुणे जिल्ह्यात पोस्ट कोव्हिड सेंटर्सची संख्या वाढणार

(opposition need to unite against modi says sanjay raut)