शिवसेनेच्या आजी-माजी आमदार समर्थकांमध्ये जोरदार राडा, तालुका प्रमुख गंभीर जखमी 

| Updated on: Jul 20, 2021 | 9:05 PM

उस्मानाबाद : शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या बॅनरवर फोटो न लावल्याने उस्मानाबादेत शिवसेनेच्या आजी-माजी आमदार समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. बॅनरवर फोटो न लावल्याच्या रागात शिवसैनिक आपआपसात भिडले. या राड्यात शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून संपूर्ण राज्यभरात संपर्क अभियान सुरू आहे. यात सर्वसामान्यांचे प्रश्न आणि विशेषत: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर […]

शिवसेनेच्या आजी-माजी आमदार समर्थकांमध्ये जोरदार राडा, तालुका प्रमुख गंभीर जखमी 
shivsena Osmanabad rada
Follow us on

उस्मानाबाद : शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या बॅनरवर फोटो न लावल्याने उस्मानाबादेत शिवसेनेच्या आजी-माजी आमदार समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. बॅनरवर फोटो न लावल्याच्या रागात शिवसैनिक आपआपसात भिडले. या राड्यात शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून संपूर्ण राज्यभरात संपर्क अभियान सुरू आहे. यात सर्वसामान्यांचे प्रश्न आणि विशेषत: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला जात आहे. शिवसेनेचे हे संपर्क अभियान सध्या तालुका स्थरावर आयोजित करण्यात आले आहे.

बॅनरवर फोटो न टाकल्याने राडा

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभेत शिवसेनेत आपापसात राडा झाला आहे. शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या बॅनरवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो लावण्यात आला नव्हता. या फोटो न लावल्याने हा वाद झाला. या वादामुळे पुन्हा एकदा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि विद्यमान आमदार डॉ तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत.

यावेळी आमदार डॉ. तानाजीराव सावंत आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या बॅनरवर ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो न टाकल्याने हा राडा झाल्याचे बोललं जात आहे.

शिवसेनेचे तालुका प्रमुख गंभीर जखमी 

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यात तब्बल 25 जणांनी लाठ्या, काठ्या, बाटल्या घेऊन हा हल्ला केल्याचे बोललं जात आहे. या राड्यात शिवसेनेचे परंडा तालुकाप्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नबार्शीमधील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या संपर्ण प्रकरणामुळे शिवसेनेतील जुना वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

(Osmanabad ShivSena Sampark Abhiyan activist clashed with each other taluka chief seriously injured)

संबंधित बातम्या : 

उस्मानाबादचा आढावा : काँग्रेस- राष्ट्रवादीचा गड संकटात, सेना- भाजपची ताकद वाढली 

महाराष्ट्रात मंदिरे बंद, मात्र डान्सबार सुरू, राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड : प्रविण दरेकर