पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुणाळी आता शिगेला पोहोचलीय. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दात फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा पार पडली. (Devendra Fadnavis’ campaign for BJP candidate Samadhan Avtade)
‘लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, अशा शब्दात फडणवीसांनी महाविसार आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.
कोरोनाच्या काळात सभा घेण्याची वेळ आली नसती तर बरं झालं असतं. परंतू पोट निवडणूक लागली. राष्ट्रवादीचे नेते आले आणि मुक्ताफळं उधळून गेली, म्हणून आम्हाला यावं लागलं. आतापर्यंत शक्ती विभागली होती पण आता ती एकवटली असल्यानं विजय निश्चित असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. 15 वर्षांत एक पैसा दिला नाही, आता देऊ-देऊ म्हणून सांगत आहेत. गरीबांचे मिटर कट करुन 5-5 हजार रुपये गोळा केले. हे सरकार तयार झालं तेव्हा महाविकास आघाडी म्हणून ओळखळं जात होतं. पण आता ते महावसुली आघाडी सरकार म्हणून ओळखलं जातं, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
सरकारमध्ये आले तेव्हा बांधावर जावून सांगायचे 50 हजार देऊ. पण 2 हजार रुपयेही दिले नाहीत. कर्जमाफी करु म्हणले, पण कोणतीही कर्जमाफी केली नाही. शेतमालाला FRP फक्त मोदी सरकारमुळे मिळतेय. हजारो रुपयांचे पॅकेज मोदी सरकारनं दिले. मोदी सरकार शेतकऱ्यांची चिंता करतंय, असा विश्वासही फडणवीसांनी दिलाय. या भागात 5 हजार कोटी रुपयांची कामं सुरु आहेत. ती पूर्ण झाल्यावर कनेक्टिव्हिटी मिळेल, मोठी बाजारपेठ निर्माण होईल. समाधान आवताडेंना निवडून द्या, 35 गावांसाठी मोदींकडून पैसे आणून देतो, असा दावाही फडणवीसांनी केला आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेत सर्वात जास्त रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रेमडेसिव्हीर वाटत आहेत. त्यांनी काय स्टॉक करुन ठेवला आहे काय? असा गंभीर सवालही फडणवीसांनी उपस्थित केलाय.
संबंधित बातम्या :
VIDEO: आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ‘त्यांना’ही ओपनमध्ये जावं लागेल; देवेंद्र फडणवीसांची टीका
पुन्हा तुफान ! भर पावसात जयंत पाटलांची सभा, लोकांना शरद पवारांची आठवण
Devendra Fadnavis’ campaign for BJP candidate Samadhan Avtade