पंचायत 3 वेबसीरीज रिलीज झालीय. ही सीरीज अनेकांना आवडली होती. दोन सीजननंतर पंचायत 3 कधी येणार? याची चाहते आतुरतेने प्रतिक्षा करत होते. तिसऱ्या सीजनमध्ये प्रह्लादचा रोल साकारणाऱ्या फैसल मलिकने आपल्या अभिनयाने सर्वांना जिंकून घेतलय. त्याच्या डायलॉग्सच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. टीव्ही 9 ने पंचायतमधील प्रह्लाद शी संवाद साधला. यावेळी फैसल मलिक अनेक मुद्यांवर बोलला. कंगना रनौतच्या राजकारणात उतरण्यावरही तो मोकळेपणाने बोलला.
फैसल मलिकने सांगितलं की, त्याने कंगना रनौतसोबत रिवॉल्वर रानी चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचा तो एग्जक्यूटिव प्रोड्यूसर होता. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंबलला गेल्याच त्याने सांगितलं. फैसल मलिक कंगनाबद्दल बोलताना म्हणाला की, “कंगना एक चांगली महिला आहे. आधी ती अशी नव्हती. पण आता असं वाटतं की, ती कोणी दुसरी व्यक्ती आहे. मला असं वाटतं की, एक्टरच काम एक्टिंग करणं आहे, त्याने तेच केलं पाहिजे. अन्य गोष्टींमध्ये पडू नये. तिची बहिण मला चांगली ओळखते. रंगोलीने आमच्यासोबत काम केलय. एक-दिड वर्ष ऑफिसमध्ये काम केलं. चांगला अनुभव होता”
समाजासाठी काही करु शकतो असं वाटत असेल, तर….
“कंगनाच्या एक्टिंगबद्दल प्रश्नच नाही. ती बेस्ट आहे. मला असं वाटत अभिनेत्री इतक्या मेहनतीने जे शिकलीय, त्यावर फोकस केला पाहिजे. कंगनाने अभिनय सोडू नये, अजून काम केलं पाहिजे” असं फैसल म्हणाला.राजकारणात प्रवेशाच्या मुद्यावर फैसल म्हणाला की, “एक्टर्सनी राजकारणात येऊ नये. राजकारणाच काम राजकारण्यांच आहे. तुम्हाला समाजासाठी आपण काही करु शकतो असं वाटत असेल, तर खासदार बनू नका. दुसर काहीतरी चांगलं करा” फैसलच्या मते, राजकारण एक असं क्षेत्र आहे, जिथे 24 तास सातही दिवस सक्रीय रहाव लागतं.
खरतर कार्यकर्त्यासाठी ती जागा
“पॉलिटिक्स एक 24 तासाचा जॉब आहे. त्यासाठी कार्यकर्ता वर्षानुवर्ष कोणाचा तरी कार्यकर्ता म्हणून काम करत असतो. त्याला हटवून तुम्ही मुंबईच्या माणसाला घेऊन येता. त्यामुळे त्याचं मन मोडणं स्वाभाविक आहे. तो कार्यकर्ताच त्या भागात, त्या शहरात लोकांमध्ये वावरत असतो. पब्लिककडून शिव्या कोण खातो, कार्यकर्ता ना. मग, तुम्ही हिंदी फिल्म इंडस्ट्रीतून कोणालातरी घेऊन येता. त्याला म्हणता खासदार बन. खरतर कार्यकर्त्यासाठी ती जागा आहे” असं फैसल म्हणाला.