मुंबई: खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्रं सुरू केलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी समर्थकांशी संवाद साधला. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मला कुणालाही राजकारण संपवून राजकारण करायचं नाही, असं सांगतानाच मी तुमच्या सर्वांचे राजीनामे फेटाळून लावत आहे, असं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. (pankaja munde addressed to her supporter in mumbai)
पंकजा मुंडे यांनी आज वरळीत पक्षव कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतानाच दिल्लीत नेमकं काय घडलं याचीही माहिती दिली. मी लालची नाही. मला सत्तेची लालसा नाही. मी असुरक्षित नाही. मला कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही. त्यामुळे मी तुमच्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करत आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
यावेळी पंकजा मुंडे यांनी दबावतंत्र करत नसल्याचं स्पष्ट केलं. मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही ती जागा नाही. ही जागा पुरणार नाही. त्यासाठी वेगळी जागा लागेल, असं पंकजा म्हणाल्या.
काल मी दिल्लीत गेले होते. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. तुम्ही कार्यकर्त्यांना समजवाल हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्या. मी फटकार खावून तुमच्यापुढे आली असेल असं वाटतं का?, असा सवालही त्यांनी केला.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मला केंद्रात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तेव्हा मी मंत्रिपद नाकारलं होतं. आता मी पद मागेल का?, असा सवालही त्यांनी केला. (pankaja munde addressed to her supporter in mumbai)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |https://t.co/B59SHuz9oC#News | #NewsUpdates |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: पंकजा मुंडेंचं दबावतंत्र नाही, त्या असं काही करणार नाहीत: आशिष शेलार
पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; वाचा, भाजप नेते राम शिंदे आणखी काय म्हणाले?
नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक, पंकजा मुंडे काय निर्णय घेणार?; वाचा सविस्तर
(pankaja munde addressed to her supporter in mumbai)