ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू, पंकजा मुंडेंचा भाजपला पहिला जाहीर इशारा; पदाधिकाऱ्यांचे राजीनामे फेटाळले

| Updated on: Jul 13, 2021 | 1:50 PM

एखादं पद मिळवणं हे आपलं ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं ध्येय आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही आणि जेव्हा अंगावर छत कोसळेल, तेव्हा बघू. (pankaja munde)

ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू, पंकजा मुंडेंचा भाजपला पहिला जाहीर इशारा; पदाधिकाऱ्यांचे राजीनामे फेटाळले
pankaja munde
Follow us on

मुंबई: एखादं पद मिळवणं हे आपलं ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं ध्येय आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही आणि जेव्हा अंगावर छत कोसळेल, तेव्हा बघू, असा इशारा देतानाच आता आपलं घर सोडायचं नाही. हा माझा निर्णय आहे तो तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामेही फेटाळून लावले. (pankaja munde indicate her future strategy at mumbai speech)

पंकजा मुंडे यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर केले. तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे. मला दबावतंत्रही करायचं नाही. माझा तो स्वभाव नाही. माझ्यावर ते संस्कारही झाले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांनी ऊसाच्या फडातून आणून माणसं जोडली. कुणाला सभापती बनवलं तर कुणाला मार्केट समितीचा चेअरमन केलं. हे असंच जाऊ द्यायचं का सगळं?, असा सवाल करतानाच इथून पुढे असा प्रयोग करू नका. तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. पद मिळवणं हे मुख्य ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही. तेव्हा बघू. पण आता आपण आपलं घर सोडायचं नाही. हा माझा निर्णय तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा आहे, असं पंकजा म्हणाल्या.

मुंडेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे

मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे. मला अमूक पद हवं, तमूक पद हवं असं मी कधीच म्हटलं नाही. कधीच तशी मागणी केली नाही. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसवणं हे गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न होतं. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच माझा संघर्ष सुरू होता. त्यासाठीच त्यांच्या निधनानंतर मी संघर्ष यात्रा काढली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पुढे खडतर मार्ग

आपली शक्ती कमी करण्याचा डाव पूर्ण होऊ द्यायचा नाही. मला पुढे खडतर मार्ग दिसतो. पण आपण संघर्ष करत राहू, असं सांगतानाच योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत. सात्विक आहोत, असं त्या म्हणाल्या.

धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न

धर्मयुद्धात पाच पांडव जिंकले. त्यांनी फक्त सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नसल्याचं कौरव म्हणाले. त्यानंतरही पांडव जिंकले. या धर्मयुद्धात पांडव का जिंकले? कारण त्यांच्याकडे कृष्णाचं सारथ्य होतं. त्यांच्याविरोधात जे लढत होते, त्यांच्या मनातही पांडवांच्या मनात प्रेम होतं. म्हणून पांडव जिंकले. काळ कधीच कुणासाठी थांबत नाही. मी दु:खी नाही. मला काही मिळालं नाही या चिल्लर गोष्टींवर मी जात नाही. मीही पांडव आहे. आम्हीही योद्धे आहोत. मीही धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्या म्हणाल्या. (pankaja munde indicate her future strategy at mumbai speech)

 

संबंधित बातम्या:

मी लालची नाही, सत्तेची लालसा नाही, कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही; पंकजा मुंडे कडाडल्या

VIDEO: पंकजा मुंडेंचं दबावतंत्र नाही, त्या असं काही करणार नाहीत: आशिष शेलार

पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; वाचा, भाजप नेते राम शिंदे आणखी काय म्हणाले?

नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक, पंकजा मुंडे काय निर्णय घेणार?; वाचा सविस्तर

(pankaja munde indicate her future strategy at mumbai speech)