तुम मुझे कब तक रोकोगे, पंकजा मुंडेंचा शायराना अंदाज, कोण रोखतंय ताईंना, पक्षातले की बाहेरचे?

| Updated on: Oct 15, 2021 | 3:44 PM

तुम मुझे कब तक रोकोगे? मुठ्ठी मे सपने लेकर जेबोमे कुछ आशाए, दिल में अरमान यहीं की कुछ करजाएँ, सूरजसा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझे कबतक रोकोगे? अपनी हद रोषण करने से तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे?, अशा शायराना अंदाजात पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका भगवानबाबांच्या भक्तांसमोर मांडली.

तुम मुझे कब तक रोकोगे, पंकजा मुंडेंचा शायराना अंदाज, कोण रोखतंय ताईंना, पक्षातले की बाहेरचे?
पंकजा मुंडे
Follow us on

बीड: आज विजयादशमी आणि दसरा आहे. दसऱ्याची भक्ती आणि शक्तीची परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी उन्हा ताणात घरची पुरणपोळी सोडून मैदानात उपस्थित झालात त्याबद्दल नतमस्तक होऊन पाया पडते. तुमच्या प्रेमासमोर माझी झोळी कमी पडतेय. भगवान बाबांची भक्ती आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची शक्ती ही वैभवाची पंरपरा सुरु ठेवण्याचं श्रेय तुम्हा सर्वांना आहे. आदरणीय महादेवराव जानकर यांनी आताच भाषण केलं. आपल्या लाडक्या खासदार प्रीतम ताईंना भाषण केलं. मंचावर खासदार सुजय विखे पाटील, माझ्या वडिलांचे अत्यंत लाडके कर्डिले साहेब, तीन जिल्ह्यांचे आमदार सुरेश आण्णा धस, प्रविणजी घुगे, मोहन दादा, मंचावर उपस्थित धोंडे साहेब, नमिता मुंदडा, एवढे नावं घेत बसलो तर बाबा इथेच संध्याकाळ होईल. किती देखणा कार्यक्रम आहे. तुम्ही गप्प बसलात तर माझा आवाज तुम्हाला ऐकू येईल, असं उपस्थित समुदायाला पंकजा मुंडे म्हणाल्या. तुम मुझे कब तक रोकोगे, पंकजा मुंडेंनी शायराना अंदाजात एकप्रकारे पक्षांतर्गत आणि पक्षातील विरोधकांना देखील इशारा दिलाय.

तुम मुझे कब तक रोकोगे

मला वाटलं मी इथे येऊ शकणार नाही. माझ्या मनात चारोळ्या आल्या. तुम मुझे कब तर रोकोगे? जानकर साहेब भाषण करताना इंग्रजीत बोलत होते. ओबीसी माणूस पेटला तर इंग्रजीत बोलतो. मध्येच हिंदी बोलतात. कारण त्यांना देशाची लिडरशीप आहे. तुम मुझे कब तक रोकोगे? मुठ्ठी मे सपने लेकर जेबोमे कुछ आशाए, दिल में अरमान यहीं की कुछ करजाएँ, सूरजसा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझे कबतक रोकोगे? अपनी हद रोषण करने से तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे?, अशा शायराना अंदाजात पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका भगवानबाबांच्या भक्तांसमोर मांडली. पंकजा मुंडे यांनी या माध्यमातून त्यांच्या विरोधकांना उत्तर दिलंय. मात्र, पंकजा मुंडे यांनी कुणाचंही नाव न घेता टीका केल्यानं पक्षांतर्गत की विरोधी पक्षातील नेत्यांना इशारा दिला आहे.

मुंडे साहेबांच्या काळात लाखो लोक मेळाव्याला यायचे

मला सांगा हा मेळावा होईल का नाही? चर्चा होती. माझ्यावर प्रेम करणारे सांगत होते, ताई मेळावा नको. का रे बाबा? म्हणे, सत्ता नाही. सत्ता नाही म्हणून मेळावा नाही? कधी या मेळाव्याने सत्ता बघितली? मुंडे साहेब सत्तेत होते का? लाखो लोक या मेळाव्याला येत होते.

‘कोणत्या नेत्याची चमचेगिरी करायला फुलं टाकत नव्हते’

मी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या ऐकू आले का तुम्हाला? समोर उपस्थित सर्व वडिलधारे मंडळी, युवा बांधव आणि मातांनो, काय सोहळा आहे, इतका देखणा सोहळा, इतका रांगडा सोहळा, मला नाही वाटत देशामध्ये कुठे होत असेल. हेलिकॉप्टरमधून यायचं आणि बैलगाडीत बसायचं. आहे का असं कुठे? आहे का? मी वरुन फुलं टाकत होते, भगवान बाबा आणि तुमच्या चरणी. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करायला फुलं टाकत नव्हते. मी भगवान बाबांवरच्या श्रद्धेपोटी आणि तुम्ही इथे आलात, तुमच्या भावनेला आदरांजली वाहण्यासाठी फुलं वाहत होते, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांचं नाव न घेता टीका केली.

माझं तुमच्याशिवाय कोण आहे?

बैलगाडीत बसले. ऊसतोड कामगारांचा कोयता होता. ऊस सुद्धा तिथे प्रतिकात्मक होता. पण मला बैलाची भीतीच वाटायची. बैल खवळले तर? ते मला म्हणाले, ताई बैल लई गरीब आहेत. मी म्हणाले, बैल लई गरीब आहेत रे, पण माणसं गरीब नाहीत. बैल जर उधळला तर पंचायत होईल माझी, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

आई जशी मुलाची दृष्ट काढते, तशी मी आता पदर तुमच्यावरुन ओवाळला. जसा पदर तुमच्यावरुन ओवाळून काढला, दृष्ट काढली, तसाच जर वेळ पडला तर जीव सुद्धा तुमच्यावर ओवाळूव टाकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याशिवाय माझं कोण आहे? आहे का असा नेता जो तुला या खुर्चीच्या मखमलवर बसवतो? आहे का असा राजकीय कुणी? माझा पिता जिवंत आहे का? मग माझं तुमच्याशिवाय कोण आहे? त्यामुळे तुमच्यापुढे जीव ओवाळून टाकेन, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

सामान्य, वंचिताची चळवळ इथून ऊर्जा घेते

मला मुंडे साहेबांनी शिकवलंय आपण ज्या मातीत जन्माला येतो, त्या मातीचा, जातीचा अपमान वाटता कामा नये. जो मोठ्या जातीत जन्म घेतील, राजघराण्यात जन्म घेतो त्यांना सुद्धा गर्व वाटू नये. आणि जो गरीब, बिछड्या जातीत. वंचितांमध्ये जन्म घेतो त्याचीसुद्धा मान खाली जायला नको. यासाठी या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महामानव डॉ. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात आज जी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण झालीय त्या परिस्थितीला दिशा देण्यासाठी भक्ती आणि शक्तीची परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मताचं राजकारण नाही. सामान्य, वंचिताची चळवळ इथून ऊर्जा घेते. छोटीची ज्योत ही मोठी मशाल बनून पूर्ण राज्याच्या कान्याकोपऱ्यात जाते.

इतर बातम्या:

Dussehra 2021 Live Updates | जर वेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन – पंकजा मुंडे

प्रीतम मुंडे म्हणाल्या मंडे टू संडे, पब्लिक म्हणाली, गोपीनाथ मुंडे, कुठपर्यंत घुमणार आवाज?

Pankaja Munde said how much time you will stop me at dasara melava at Bhagwan Bhaktigad