मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या सत्तासंघर्ष शिगेला पोहचलायं. मात्र, यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) या लंडनला आहेत. बुधवारी लंडनमधील प्रसिद्ध मंदिराला भेट देऊन त्यांनी तेथे विशेष पूजा देखील केलीयं. अमृता या गायक आणि बॅंकर आहेत. मात्र, राजकीय घडामोडींबद्दल त्या नेहमीच आपले मत मांडताना दिसतात. अनेकदा शिवसेना आणि अमृता फडणवीस यांच्यामध्ये ट्विटर वांर देखील रंगतो. अमृता फडणवीस कायमच त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात. राज्यातील सध्याची राजकिय परिस्थिती बघता मिसेस फडणवीस लंडनला (London) काय करत असल्याचा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.
Namaste #London !
Landed at London & visited #BAPS Swaminarayan Hindu Temple-first largest Hindu temple in foreign land &
Performed special Puja!
Prayed for stability & prosperity of #Maharashtra
May we never forget the Mantra of democracy;
People first, Party Next, Self Last? pic.twitter.com/frax1rQJo7 हे सुद्धा वाचा— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) June 29, 2022
“नमस्ते #लंडन ! अशा प्रकारची एक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केली आहे. अमृता फडणवीस यांनी लिहिले की, स्वामीनारायण हिंदू मंदिराला भेट दिली. परदेशातील पहिले सर्वात मोठे हिंदू मंदिर आणि विशेष पूजा केली. महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच पुढे मिसेस फडणवीसांनी लिहिले की, लोकशाहीचा मंत्र आपण कधीही विसरू नये,” असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आणि मंदिराच्या भेटीचे काही फोटोही शेअर केले.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर अमृता फडणवीस यांचे एक ट्विट प्रचंड चर्चेत आले होते. अमृता फडणवीस यांनी हिंदीत ट्विट करत लिहिले होते की, ‘एक था कपटी राजा’ मात्र, त्यानंतर काही वेळातच अमृता फडणवीस यांनी हे ट्विट डिलीटही केले. या ट्विटवर सोशल मीडिया युजर्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी हे ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी असल्याचे म्हटले होते. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडतांना दिसत आहेत.